डोणगावः मेहकर तालुक्यातील अकोला ठाकरे येथे ग्रामसेवकाच्या कामात व्यत्यय निर्माण करून, त्यास मारहाण केल्याप्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. ग्रामसेवक दीपक भानुदास हुंबाड (५०) हे ग्रामपंचायत कार्यालयात असताना अमोल नामदेव महाजन (रा.अकोला ठाकरे) हे कार्यालयात आले., त्यांनी ग्रामसेवक दीपक हुंबाड यांना मारहाण करून शिवीगाळ करत, शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार हुंबाड यांनी पोलिसात दिली.