Headlines

मलकापूरच्या राजकारणात ओबीसी नगराध्यक्षपदासाठी सौ. चेतनाताई राठींचं नाव चर्चेच्या शिखरावर!

मलकापूर ( दिपक इटणारे ) : – आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण रंगतदार बनले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाकडून ओबीसी आरक्षणाच्या नगराध्यक्ष पदासाठी इंजि. सौ. चेतनाताई गिरीराज राठी यांचे नाव सध्या शहरभर चर्चेत आहे. नागरिकांमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून राठी परिवार यांना पक्षाने पुन्हा संधी दिली तर परत एकदा नगराध्यक्षपदावर झेंडा फडकवेल अशी चर्चा मलकापूर शहरात जोर धरत आहे. इंजि. सौ. चेतनाताई गिरीराज राठी या केवळ शिक्षणाने नव्हे तर कार्यानेही लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे, कार्यतत्परतेमुळे आणि समाजकारणातील सहभागामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती गिरीराज राठी हे व्यापाऱ्यांशी दांडगा संपर्क असलेले, सर्व समाजघटकांमध्ये मिसळून राहणारे आणि लोकहिताची भावना जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. राठी परिवाराचा काँग्रेस पक्षाशी असलेला संबंध हा दशकांपासूनचा आहे. श्यामकुमार राठी यांनी तब्बल तीस वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय भूमिका बजावली असून त्यांनी शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांचे कार्यकर्त्यांशी घट्ट नातं, लोकांशी असलेला भावनिक संवाद आणि तळागाळात निर्माण केलेला विश्वास यामुळे राठी कुटुंबाचं नाव आजही मलकापूरात आदराने घेतलं जातं. डिसेंबर 2002 साली श्यामकुमार राठी हे जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या समाजोपयोगी योजनांनी मलकापूर शहराला नवा आयाम दिला होता. नागरिकांशी जोडलेले राहून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या त्या सुवर्ण कार्यकाळाच्या आठवणी आजही नागरिकांच्या मनात ताज्या आहेत. आणि त्यामुळेच लोकांमध्ये असा विश्वास निर्माण झाला आहे की यावेळी पुन्हा राठी परिवारातूनच नगराध्यक्ष पाहायला मिळेल. इंजि. सौ चेतनाताई गिरीराज राठी यांची शिक्षणक्षेत्रातील पार्श्वभूमी, समाजसेवेतील सक्रियता, महिला वर्गाशी असलेले दृढ संबंध, काँग्रेस पक्षाशी असलेली एकनिष्ठता या सर्व घटकांचा लाभ त्यांना होईल अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. काँग्रेस पक्षाकडून ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर योग्य, सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असताना राठी परिवाराचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर मलकापूरच्या राजकारणात या घडामोडींमुळे नवचैतन्य निर्माण झालं आहे. राठी परिवाराच्या समाजाभिमुख कार्यामुळे नागरिकांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की यावेळी पुन्हा मलकापूरच्या नेतृत्वाची जबाबदारी राठी परिवाराच्या विश्वासार्ह हातात गेल्यास शहराचा विकास निश्चित वेग घेईल. शहरातील राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा राठी नाव झळकताना दिसत आहे. आणि जनतेच्या मनात एकच प्रश्न उमटू लागला आहे. यावेळी नगराध्यक्षपदावर राठी परिवाराचा झेंडा पुन्हा फडकणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!