Headlines

मलकापूरची कन्या तलवारबाजी ची उत्कृष्ट खेळाडू कु. गौरी सोळंके हिची पुन्हा कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धा न्युझीलंड येथे होणार

मलकापूर:- मलकापूर ची शान म्हणजे तलवारबाजी ची उत्कृष्ट खेळाडू कु.गौरी मंगलसिंग सोळंके हिची न्यूझीलंड मध्ये होणाऱ्या 12 जुलै ते 19 जुलै 2024 दरम्यान कॉमनवेल्थ ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेत निवड झाली आहे. मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे रहिवासी तथा सध्या मलकापूर चैतन्यवाडी नगर मध्ये वास्तव्यास आहे. ही आपल्या मलकापूर वासियांसाठी गर्वाची बाब आहे.गौरी मुळे मलकापूर शहराचा तसेच जिल्हाचा नावलोकिक वाढविला.
गत वर्ष 2021-22 मध्ये लंडन येथे झालेल्या कॉमनवेल स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते नंतर कुवेत येथे एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा खेळली,,तसेच फेब्रुवारी 2024 मध्ये इटली येथे तलवारबाजीच्या 21 दिवसाचे विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली होती ते प्रशिक्षण घेतले आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या नॅशनल सीनियर तलवारबाजी 2023–24 स्पर्धेमध्ये टीम मध्ये रजत पदक मिळवले या तिच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनत या सर्व अनुभवाच्या जोरावर तिची या स्पर्धेत निवड झाली आहे.विदर्भातून 2 वेळा कॉमनवेल्थ स्पर्धा खेळणारी ती एकमेव खेळाडू आहे.
गौरीच्या यशाबद्दल जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी राजे जाधव, सचिव शेषनारायण लोढे, स्पोर्ट झोन ऑफ मलकापूरचे सचिव विजय पळसकर सर, बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर साहेब, धारपवार सर तसेच लि.भो.चांडक विद्यालय चे संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षकवृंद व चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मलकापूर या सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे. व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तिचे प्रशिक्षण– स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया ( साई अकॅडमी संभाजीनगर ) येथे ती 3–4 वर्षापासून तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. तिला तलवारबाजीचे लाभलेले प्रशिक्षक तुकाराम मेहेत्रे सर यांनी घेतलेल्या मेहनतीने ती आज या यशापर्यंत पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *