Headlines

बीडी पितांना कपड्यांना आग, आगीत होरपळून मनोरुग्णाचा मृत्यू, लोणार येथील रुग्णालयातील धक्कादायक घटना!

लोणार :- येथील ग्रामीण रुग्णालयात काल रात्री एक दुर्दैवी घटना घडली. उपचारा करिता आणलेल्या एका मनोरुग्णाच्या कपड्यांना बिडी पितांना जनरल वॉर्डमध्ये आग लागून आगीत एका मनोरुग्णाचा होरपळून मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव हरिभाऊ रोकडे असून तो पैठण येथील रहिवासी होता. २२ डिसेंबर रोजी लोणार बसस्थानकावर अत्यवस्थ अवस्थेत सापडलेल्या या मनोरुग्णाला अॅम्बुलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले होते. सुरुवातीला त्याने आपली ओळख सांगितली नव्हती, मात्र नंतर त्याने आपले नाव व मूळ गाव सांगितले. त्याला विचारल्यानंतर, “या जगात आपले कुणीही नाही,” असे त्याने सांगितले होते.जनरल वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री अचानक वॉर्डमधून धूर निघत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, हरिभाऊ रोकडे हे पलंगावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले दिसले. कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मनोरुग्णाचा पूर्णतः होरपळून मृत्यू झाला होता.सीसीटीव्ही फुटेजनुसार, बिडी पिताना कपड्यांना आग लागल्याचे दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!