Headlines

विज्ञान महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

 

मलकापूर :- स्थानिक गौरीशंकर सेवा समिती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, मलकापुर येथे दिनांक 1 डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिन निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी आणि सोशल मीडिया पोस्ट मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अनघा लोखंडे मॅडम ह्या होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री संदीप आढाव सर यांनी दर्शवली. या कार्यक्रमात रासेयो कार्यक्रम अधिकारी सौ पूनम इंगळे, प्रा. रुपेश पाटील सर उपस्थित होते. या स्पर्धेचे विषय मातेपासून तिच्या होणाऱ्या बाळास एचआयव्ही/एड्स पासुन सरंक्षन, एचआयव्ही/एड्स संक्रमनाचे मार्ग व प्रतिबंधात्म्क उपाय, एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017, एचआयव्ही/एड्स जनजागृती टोल फ्री क्रमांक 1097, मादक द्रव्याचे सेवन व त्याचे दुष्परिणामअसून या स्पर्धेसाठी उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध प्रतिसाद नोंदवला त्यामध्ये पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक ओम दीक्षित आणि द्वितीय क्रमांक सलोनी पाटील हिने पटकावला तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूजा वानखेडे आणि द्वितीय क्रमांक प्रतीक्षा नारखेडे हिने पटकावला आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ पूनम इंगळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्कान पटेल हिने केले. सौ अनघा लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयी माहिती देऊन एखा‌द्या एड्स बाधित व्यक्तीची काळजी कशी घ्यावी हे सांगितले. तसेच संदीप आढाव सर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की एड्सचे जनजागृती ही जागतिक स्तरावर होऊन ती स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे आणि जे भाग घेणारे विद्यार्थी होते त्यापैकी सरांनी उत्तेजनार्थ मुलांना बक्षीस दिले त्यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये मानसी आसटकर, दिपाली वनारे आणि शुभांगी ईश्वरे तसेच पोस्ट मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये ज्ञानेश्वरी गायकवाड, प्राजक्ता सपकाळ आणि कुणाल कहाते यांना देण्यात आले
या कार्यक्रमच्या यशस्वीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!