Headlines

रेल्वेत चोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश: शेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरटे मलकापुरातील पारपेठ भागातील रहिवासी

शेगाव: नागपूर-पुणे एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करत शेगाव लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल १.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सुमित प्रभाकर आग्रे (रा. ताथवडे रोड, पुणे) हे नागपूर-पुणे एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ झोपेत असताना त्यांची बॅग चोरीला गेली. बॅगमध्ये लॅपटॉप, दोन मोबाइल, हेडफोन, चार्जर, तसेच ७०,००० रुपये किमतीची सोन्याची चेन असा सुमारे १.२६ लाखांचा मुद्देमाल होता. त्यांनी तातडीने शेगाव लोहमार्ग पोलिसांत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपास सुरू करून, उपलब्ध माहितीच्या आधारे शेख जुनेद शेख आरिफ (२१, रा. मुसा कॉलनी, मलकापूर) व सय्यद अजगर सय्यद नूर (२९, रा. कुरेशी वाडा, पारपेठ, मलकापूर) या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाइल फोन, माउस, हेडफोन, चार्जर, व सोन्याची चेन असा एकूण १ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठाणेदार विवेकानंद राळेभात, सुनील इंगळे, किशोर पाटील, अशोक लांडगे, जगदीश ठाकूर, व गजानन मेटांगे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. या धाडसत्राने रेल्वेत प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!