मलकापूर, – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (आयक्यूएसी) वतीने २८ सप्टेंबर २०२४ रोजी “संस्थेची स्वायत्तता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना संस्थात्मक स्वायत्ततेचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणे हा होता.
कार्यशाळेत प्राध्यापकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वायत्ततेचे महत्त्व पटवून देत त्यांना निर्णयक्षमता, आत्मनिर्भरता आणि सुज्ञ विचार करण्याच्या दिशेने प्रेरित करण्यात आले. यामध्ये शिक्षकांनी संस्थात्मक स्वायत्ततेविषयी सखोल चर्चा केली, ज्यातून शैक्षणिक संस्था स्वायत्तता कशी मिळवू शकते आणि तिच्या कार्यक्षमतेत सुधारणा कशी साधता येईल, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डी. आर. राऊत परीक्षा नियंत्रक, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर यांनी आपले विचार मांडले. त्यांनी स्वायत्ततेच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करून संस्थात्मक स्वायत्ततेचे फायदे आणि आव्हाने यावर विस्तृत चर्चा केली. उपस्थित प्राध्यापकांनी या चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्यांच्या मनातील प्रश्न विचारून उत्तरे मिळवली.
या कार्यशाळेचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने करण्यात आले होते. या एकदिवसीय कार्यशाळेचे प्रमुख संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे होते, तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. आर. एम. चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. तांत्रिक समितीत प्रा. ए. एस. नारखेडे आणि प्रा. एम. यू. करांडे यांनी योगदान दिले.
कार्यशाळेत चर्चा झालेल्या मुद्द्यांमुळे शिक्षकांच्या मनामध्ये संस्थात्मक स्वायत्ततेबद्दल नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आहे. या कार्यशाळेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात अधिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढील वाटचाल निश्चित झाली आहे.
कार्यशाळेत प्रा नितीन खर्चे, प्रा योगेश सुशीर, प्रा. संतोष शेकोकार, प्रा जयप्रकाश सोनोने, प्रा साकेत पाटील,. प्रा. महेश शास्त्री सह महाविद्यालयतील प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता