Headlines

मलकापुरातील या परिसरात जमाबंदी आदेश लागू, नियमांचे पालन न केल्यास कारवाई

मलकापूर : उपोषणास बसलेल्या कोळी महादेव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्ट रोजी अचानकपणे शहरांमध्ये रास्तारोको केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी २ सप्टेंबरपर्यंत या परिसरामध्ये कलम १६३ (३) लागू केली आहे.उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की, ३१ ऑगस्ट रोजी शहरांमध्ये आदिवासी कोळी महादेव जमातीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे. अंदाजे ५० ते ६० जणांनी अचानकपणे रस्त्यावर येऊन रास्तारोको केला. त्यामुळे शहरांमध्ये काही काळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी संबंधित आंदोलनकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सोमवारी पोळा सण असल्याने व आदिवासी कोळी महादेव समाजाचे उपोषण सुरू असल्याने शहरांमध्ये जातीय
तणाव अदृश्य निर्माण होऊ नये. त्याचप्रमाणे मलकापूर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच सदरचे कोळी महादेव समाजाचे उपोषण संपेपर्यंत २ सप्टेंबरपर्यंत तहसील चौक ते जिल्हा परिषद हायस्कूल या रस्त्यावर कलम १६३ (३) अन्वये जमाव करण्यास, वाहनांना प्रवेश, अनधिकृत प्रवेश, यावर बंदी घालण्यात आली आहे. याविरुद्ध कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास, प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!