बुलढाणा :- पान टपरी फोडून त्यातील ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील तहसिल चौकात उघडकीस आली. याप्रकरणी फिर्यादी चेतन चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील विदर्भ हाऊसींग सोसायटी येथील चेतन गजानन चोपडे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली की, त्यांची तहसिल चौकात पानटपरी आहे. चोरट्यांनी पानटपरी फोडून त्यातील ३६ हजार ४०० रुपयांची सुपारी, सिगारेट १२०० रुपये, गोल्ड ब्लक सिगारेट २५०० रुपये, व गल्ल्यातील रोख ४ हजार असा एकूण ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल ३० जुलै रोजी लंपास केल्याच्या चेतन चोपडे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ए), ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.