Headlines

माणुसकीला काळिमा! हकिमी हॉस्पिटलने अडकवला सहा तास मृतदेह; हे हॉस्पिटल कि बँक? मलकापूर शहरातील संतापजनक प्रकार

मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ): शहरातील भारत कला रोडवरील हकिमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह तब्बल सहा तास अडवून ठेवण्यात आल्याची घटना घडली. हॉस्पिटल प्रशासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ४० हजार रुपयांची मागणी करत मृतदेह नातेवाईकांना दिला नाही. या प्रकारामुळे नातेवाईकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन…

Read More

“कानमंत्र” देण्याच्या बहाण्याने निवृत्त मुख्याध्यापकाची सोन्याची अंगठी लंपास; आरोपी सीसीटीव्हीत कैद

बुलढाणा : – शहरातील कारंजा चौकात ७ एप्रिल रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. “कानमंत्र देतो” असे सांगत एका अज्ञात व्यक्तीने निवृत्त मुख्याध्यापक बंडू चव्हाण (वय ७९, रा. चेतनानगर) यांची १२ ग्रॅम सोन्याची अंगठी फसवणूक करत लंपास केली. संत-महात्म्यांची नावे घेत, धार्मिकता आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करत आरोपीने चव्हाण यांना भावनिक जाळ्यात ओढले. अंगठी रुमालात…

Read More

सावरगाव मार्गावर मलकापूरच्या ऑटो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले; ६२०० रुपयांचा ऐवज लंपास! धामणगाव बढे पोस्टेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

  धामणगाव बढे : – दुचाकीवर आलेल्या दोघांनी ऑटोचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ६,२०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना सोमवार, ८ एप्रिल रोजी पहाटे सावरगाव मार्गावर घडली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास नारायण जैस्वाल (रा. शिवाजीनगर, मलकापूर) हे प्रवासी घेऊन ऑटोरिक्षाने सावरगावकडे जात…

Read More

खामगाव बसस्टॉप वर ४७ हजारांची रोकडं चोरी; आरोपी २४ तासांत गजाआड, ४५ हजारांची रोकड जप्त! खामगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

खामगाव : – खामगाव एसटी बसस्थानकावर एका ज्येष्ठ प्रवाशाच्या खिशातून ४७ हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याजवळून ४५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी घडली. मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथील ८२ वर्षीय वासुदेव दत्तात्रय कुलकर्णी हे खामगाव बसस्थानकावरून आपल्या गावी…

Read More

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला; चिखलीत खळबळ

चिखली – शहरातील स. द. म्हस्के रोड परिसरात एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख दुर्गाबाई जुलालसिंग राजपूत (वय ६५, रा. रामानंद नगर, चिखली) अशी झाली आहे. दुर्गाबाई राजपूत या मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या नातेवाइकांनी ४ एप्रिल रोजी चिखली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी…

Read More

शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेला मारहाण ; आरोपी विरुद्ध गुन्हा नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा – शेती नावावर करून दे, या कारणावरून एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेला नातेवाईकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे ४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात कैलास पांडुरंग साबे (वय ४८, रा. अलमपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा नातेवाईक श्रीकृष्ण रामेश्वर साबे (रा….

Read More

वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी फूस लावून पळवली; कुऱ्हा काकोडाच्या आकाश चौफेवर गुन्हा दाखल!

  मोताळा : – बोराखेडी शिवारातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलगी फूस लावून पळविण्यात आल्याची घटना ४ एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी कुर्हा काकोडा येथील आकाश चौफे याच्याविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एक महिला आपल्या कुटुंबासह बोराखेडी शिवारातील वीटभट्टीवर मजुरीचे काम…

Read More

गळफास घेवून वृध्दाची आत्महत्या; खामगाव तालुक्यातील वाडी येथील घटना!

  खामगाव : तालुक्यातील वाडी येथे वृध्दाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश वसंतराव सुर्यवंशी वय ३९ वर्षे रा. सप्तशृंगीनगर वाडी यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, त्यांच्या पत्नीने फोन करुन सांगितले की, तुमच्या वडिलांनी लोखंडी खिडकीचे ग्रीलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून…

Read More

एकाच रात्री चार घरे फोडली, ६.४४ लाखांचा ऐवज लंपास; शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील घटना!

  जलंब – शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे ४ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अमित आळशी यांच्या घरातून एकूण ५ लाख ६५ हजारांचे दागिने व रोकड चोरली….

Read More

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिला पळविली; शारीरिक अत्याचार आणि मारहाणीचा महिलेचा आरोप; गुन्हा दाखल; खामगाव येथील घटना

खामगाव: तालुक्यातील २१ वर्षीय महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ जानेवारी ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत घडल्याचे पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदार महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, तिचे घटस्फोटाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून तिचा…

Read More
error: Content is protected !!