नवदुर्गा लेझीम महोत्सव मंडळाकडून पारंपरिक खेळांचे पुनर्रोजीवन; लेझीम प्रत्यक्षिक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मलकापूर :- मोबाईल, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या तरुणाईसाठी संस्कृतीची जाग आणणारा भव्य कार्यक्रम म्हणजेच नवदुर्गा लेझीम महोत्सव मंडळाने आयोजित केलेली लेझीम प्रत्यक्षिक स्पर्धा! हरवलेल्या पारंपारिक खेळांना पुन्हा जिवंत करण्याचा हा उपक्रम शहराच्या मैदानावर रंगला आणि नागरिक, तरुणाई व महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभागाने त्यास प्रतिसाद दिला. ढोल-ताशांचा गजर, तालबद्ध हालचाली आणि झंकारलेली लेझीम…
