Headlines

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त मलकापूर येथे ‘स्वच्छता अभियाना’चा उपक्रम

मलकापूर :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा, तालुका विधी सेवा समिती, मलकापूर, वकील संघ, मलकापूर आणि न्यायालयीन कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथील सचिव नितीन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार “राष्ट्रीय विधी सेवा दिना”चे औचित्य साधून रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी…

Read More

मलकापूरच्या तरुणीचा मुंबईत अपघात ; आयसीआयसीआय बँक मध्ये होती कार्यरत; ३ महिन्यांवरच होणारं लग्न उध्वस्त

  मुंबई/ मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात आयसीआयसीआय बँकेत कार्यरत असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. पाठीमागून आलेल्या पाण्याच्या टॅंकरने दिलेल्या जोरदार धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, फक्त तीन महिन्यांवर असलेलं तिचं लग्न या अपघातात उध्वस्त झालं आहे. मृत तरुणीचे नाव खुशबू दीपक परयानी (वय…

Read More

मलकापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

  मलकापूर:- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी आवश्यक अधिकार जिल्हाधिकारी डी. किरण पाटील यांना प्रदान केले असून, त्या अनुषंगाने मलकापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, मलकापूर नगरपरिषदेत एकूण १५ प्रभागांतून…

Read More

पत्रकारितेतून समाजसेवेचा प्रवास; आता जनतेच्या आवाजासाठी राजकारणात दिपक ईटणारे सज्ज! प्रभाग क्रमांक 15 मधून लढण्याची तयारी..

  मलकापूर : -( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीला आता वेग आला असून, शहरातील राजकीय वर्तुळात एका नव्या आणि ताज्या चेहऱ्याच्या प्रवेशाने चांगलीच चर्चा रंगली आहे. जनतेचा आवाज म्हणून ओळख असलेले, तळागाळातील समस्यांवर थेट लेखणी चालवून प्रशासनाला जागे करणारे युवा पत्रकार दीपक गणेश इटणारे यांनी प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणुकीची तयारी सुरू…

Read More

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन तायडे यांच्याकडे मलकापूर उपविभागासह जळगाव जा. उपविभागाचा पदभार

मलकापूर : मलकापूर व नांदुरा तालुक्यात आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत अनेक रस्ते, इमारती व पुलांची दर्जेदार कामे करून घेणारे सार्वजनिक उपविभागाचे उपविभागीय अभियंता (क्लास १ अधिकारी) सचिन तायडे यांच्याकडे आता जळगाव जामोद उपविभागाचा कार्यभार आला असून या अंतर्गत जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात ते कार्यरत असणार आहेत. सार्वजनिक उपविभागीय बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता…

Read More

पिंप्रीगवळी परिसरात अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान; शासनाने तातडीने मदतीची मागणी

मोताळा/ प्रिंप्री गवळी : – शनिवार रात्री झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिंप्रीगवळीसह परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मका, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांचे काढणीस तयार पिक पूर्णपणे वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचल्याने शेती खरडून गेली असून पिकांना कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेला…

Read More

एक वर्ष उलटलं… पण विकास झोपेतच! न.प. निवडणूकित नगराध्यक्ष-नगरसेवक पदांचे उमेदवार कोणत्या तोंडानी मत मागणार? मलकापूर भाजपसमोर अवघड समीकरण

मलकापूर (दिपक इटणारे) : विधानसभा निवडणुकीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले असतानाही मलकापूर मतदारसंघातील विकासाची गंगा अद्यापही थांबलेलीच आहे. निवडणुकीपूर्वी विकासाचे गाजावाजा करून मतदारांना ‘स्मार्ट मलकापूर’चे स्वप्न दाखविणाऱ्या सत्ताधारी भाजपसमोर न.प. निवडणूकित नगराध्यक्ष-नगरसेवक पदांचे उमेदवार कोणत्या तोंडानी मत मागणार? असा विश्वासाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार चैनसुख संचेती यांनी शहरातील…

Read More
error: Content is protected !!