Headlines

पत्रकारितेतून लोकसेवेकडे; दिपक गणेश ईटणारे यांचा प्रभाग क्रमांक 15 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल!

मलकापूर :- स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच मलकापूर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी तयारीला जोर दिला असून प्रभाग क्रमांक 15 मध्येही नवीन समीकरणे तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकार दीपक गणेश ईटणारे यांनी आज प्रभाग क्र. 15 मधून अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दीपक ईटणारे हे गेल्या अनेक वर्षांपासून…

Read More

विदर्भ लाईव्हच्या बातमीचा दमदार इम्पॅक्ट; सहा दिवस बंद असलेली कचरा गाडी पुन्हा सुरू..

  मलकापूर :- ( उमेश ईटणारे ) शहरातील सहा दिवसांपासून ठप्प पडलेली कचरा गाडी सेवा अखेर आज पुन्हा सुरू झाली आहे. विदर्भ लाईव्हने काल प्रसिद्ध केलेल्या बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेत या गंभीर प्रश्नावर कारवाई केली असून शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांमध्ये…

Read More

सहा दिवसांपासून कचरा गाडी बंद, शहर दुर्गंधी, डास आणि रोगराईच्या विळख्यात; प्रशासन ठप्प, लोकप्रतिनिधी बेपत्ता!

  मलकापूर :- शहरात गेल्या सहा दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने शहर अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबले आहे. मुख्य रस्ते, गल्ल्या, बाजारपेठ, सर्वत्र उघड्यावर कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले असून तीव्र दुर्गंधी व डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप…

Read More

नगरपालिका निवडणुकीत युवा तरुणांची लाट; ९ वर्षांनंतरच्या निवडणुकीत युवा उमेदवारांचा उत्साह शिगेला; मलकापूर शहरात १५ प्रभागांमधून ३० नगरसेवकांची निवड; यंदा ‘युवा विरुद्ध जुने चेहरे’ अशी लढत रंगणार!”

मलकापूर ( उमेश इटणारे ): तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीने संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, यंदाची निवडणूक एक वेगळाच रंग घेणार असल्याचं चित्र दिसत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे युवा वर्गाचा राजकारणात झालेला भव्य प्रवेश. शहरातील बहुतेक प्रभागातून तरुणांनीच निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून, संपूर्ण शहरात ‘युवा विरुद्ध…

Read More

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू’ जयंती उत्साहात; बालदिन विविध उपक्रमांनी साजरा

  मलकापूर:- शिक्षण, संस्कार आणि बालहित यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या नूतन इंग्लिश स्कूलमध्ये आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांच्या आनंदोत्सवाने आणि विविध उपक्रमांच्या रंगतदार कार्यक्रमाने संपूर्ण शाळा परिसराला जणू बालदिनाचा सणच अवतरल्याचा भास होत होता. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सुरेश खर्चे सर यांच्या हस्ते चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस…

Read More

मलकापूरात नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी; मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता!

  मलकापूर ( उमेश ईटणारे ) : – शहराचं राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापलं आहे. नुकतीच नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच मलकापूरच्या राजकारणात नव्या उलथापालथींची चाहूल लागली आहे. दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, शहरातील प्रत्येक गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत फक्त एकच चर्चा रंगली आहे यावेळी नगराध्यक्षपदावर कोणाचा झेंडा फडकणार? मलकापूरात यंदा भाजप आणि…

Read More

कोलते इंजिनिअरिंगमधील विद्युत अभियांत्रिकी विभागातील विनय जयंत पाटील याने अमरावती विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून महाविद्यालयाचा गौरव वाढविला

  मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथील अंतिम वर्ष विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी विनय जयंत पाटील याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.या भव्य यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्याच्या क्रीडाप्रेम, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावामुळे…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संकेत सावळेचा अँटी रॅगिंग राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय मान

  मलकापूर – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी संकेत संजय सावळे याने अँटी रॅगिंग नॅशनल कॉन्टेस्ट २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह मलकापूर शहराचा अभिमान वाढविण्यात संकेतनं मोठा वाटा उचलला आहे. ही स्पर्धा विद्यापीठ…

Read More

कॅफेच्या नावाखाली सुरू होता अश्लील व्यापार; पोलिसांनी उघड केला घाणेरडा प्रकार, पाच जण ताब्यात!

  मेहकर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहरातील लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्समधील पर्पल फूड कॉर्नर कॅफे येथे पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी सकाळी धाड टाकत अश्लील कृत्यांमध्ये गुंतलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. यामध्ये तिघे तरुण अश्लील चाळे करताना रंगेहात पकडले गेले असून, कॅफेचा मालक आणि भागीदार या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी…

Read More

मलकापूरात तरुणीवर चाकूने हल्ला करून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गोकुलधाम परिसरातील धक्कादायक घटना

मलकापूर : एका किरकोळ वादाने विक्राळ रूप धारण करत शहरातील गोकुलधाम परिसरात मंगळवारी सकाळी चाकू हल्ल्याची थरारक घटना घडली. संतापाच्या भरात २९ वर्षीय युवकाने एका २५ वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला करत तिच्या मानेवर चाकूने वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या मानेवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, दोघेही सध्या खासगी…

Read More
error: Content is protected !!