Headlines

वृक्षारोपण हि चळवळ होणे गरजेचे आहे : प्रा . सौ . पूनम इंगळे

मलकापूर :- स्थानिक गौरीशंकर सेवा समितीद्वारे संचलित विज्ञान महाविद्यालय , मलकापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक २८ जुन २०२४ रोजी वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा . सौ . पूनम इंगळे यांनी समुदायासाठी वृक्षारोपण होणे खुप महत्वाचे आहे . वृक्षारोपण हि चळवळ होणे गरजेचे आहे . हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता…

Read More

उज्वल भविष्य घडवायचे असेल तर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडावा लागेल- अनिल अकाळ

मलकापूर : तुम्हाला उज्वल भविष्य घडवायचे असेल तर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडावा लागेल. यासाठी तुम्ही आर्टस्, कॉमर्स, सायन्स कुठल्या क्षेत्रातून आला आहेत याला महत्व राहत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना ज्यामध्ये आवड असेल ते क्षेत्र निवडायची पालकांनी मोकळीक द्या. एक विद्यार्थी घडला तर तो त्याच्या तीन पिढ्या घडवू शकतो, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षणाधिकारी…

Read More

चोरट्यांची हिंमत वाढली,पाठलाग करत दुचाकी स्वाराला धक्का मारून खाली पाडले, डोक्यावर टॉमिने मारहाण केली, 37 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला,मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापुर:- मलकापूर रेल्वे स्टेशनवर उतरून मोटारसायकल ने घराकडे जात असलेल्या 52 वर्षीय इसमाचा पाठलाग करून दाताळा येथील सातवळेश्वर मंदिराजवळील टि पाईन्ट जवळ पाठीमागून मोटारसायकल वर आलेल्या दोघांपैकी एकाने लाथ मारुन खाली पाडत जवळील लोखंडी टाॅमी ने डोक्यावर मारुन जख्मी करुन बॅगेतील रोख रक्कमेसह मोबाईल असा एकूण 37000/- हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी…

Read More

राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा अन् निधीचा वर्षाव महिलांना महिन्याकाठी दीड हजार, वर्षाला तीन सिलिंडर मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज

वृत्तसेवा :- मुंबई, २८ जून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून, यासाठी दरवर्षी सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. १७ शहरांमधील १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असून, ८० कोटी रुपयांच्या निधीची…

Read More

समृद्धी महामार्गावर इर्टिका कार आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी

देऊळगाव राजा : समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. छोट्यामोठ्या चुकांमुळे मोठमोठे अपघात समृद्धी मार्गावर घडत आहे. असाच एक मोठा भीषण अपघात जालना जिल्ह्याच्या हद्दीत २८ जूनच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर रित्या जखमी झाले असल्याची माहिती आहे.नागपूरवरून मुंबईकडे जाणारी इर्टिका आणि डिझेल भरून…

Read More

म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालयाची लाईट कट करण्याचा शिवसेना (उ.बा.ठा) ने ईशारा देताच वाकोडी ग्रा.प.हद्दितील आदर्श नगर,साई नगर भाग 1,2 साठी नविन ट्रान्सफॉर्मर मंजुर

मलकापुर:- वाकोडी ग्रा.प.हद्तील आदर्श नगर,साई नगर,भाग 1,2, पवनसुत नगर,सरस्वती नगर, नालंदा नगर, आदि नगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पावसाळ्यात वेळोवेळी जाणाऱ्या लाईट मुळे 100 के.व्हि च्या ट्रान्स्फर ऐवजी 200 के.व्हि चा ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीसाठी दि.18 मंगळवार रोजी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, शिवसेना उपशहरप्रमुख शे.समद कुरेशी,कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास,मोहन सोनोने,मो.ईसाक तेली,सत्तार…

Read More

वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, विषबाधा झाल्याचा अंदाज, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर:- तालुक्यातील लोणवडी येथील बारा वर्षीय चिमुकल्याची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.26 जून बुधवार रोजी दुपारी घडली. अथर्वचा मृत्यू झाला त्याचदिवशी वडिलांचा जन्मदिवस सुद्धा होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की ( अथर्व नितीन खर्चे वय १२ वर्ष )रा.लोणवडी असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. अथर्वचे वडील शेती करून आपला कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवितात. अथर्वचे…

Read More

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ

मलकापूर: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अभियांत्रिकी पदविका (पाॅलिटेक्निक) या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी येत्या ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी देण्यात आलेली मुदत २५ जून रोजी संपुष्टात आल्याने आता ९ जुलै पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. राज्यात ३९० संस्थांत सुमारे 1 लाख ५ हजार प्रवेश क्षमता…

Read More

डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या विरुद्ध गठीत चौकशी समितीची चौकशी संशयाच्या भौवऱ्यात पीडित मातेने काळे झेंडे दाखवून चौकशी समितीचा केला निषेध

मलकापूर:शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल रमेश चोपडे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने मुलाच्या आयुष्याचे नुकसान झाले अशी तक्रार पीडित माता पुनम भारंबे यांनी गेल्या काळात केली होती. या पिढीत मातेच्या तक्रारीवरून तीन सदस्य समिती डॉक्टर चोपडेविरुद्ध गठीत करण्यात आली होती. आज दिनांक 26 जून रोजी मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे चौकशी करण्यासाठी समिती आली असता समितीतील सदस्यांची…

Read More

विहिरीत पडल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, शेगाव तालुक्यातील घटना

शेगाव : शेतातील विहिरीत पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सवर्णा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. सवर्णा येथील अभिजीत संजय इंगळे (वय १९) हा युवक शौचास गेला होता. मात्र, तो उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध केली. पण तो कोठेही दिसून आला नाही.अभिजीत हा विहिरीमध्ये पडला असावा म्हणून गावातील नागरिकांनी गळ टाकून पाहिले…

Read More