Headlines

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत के बी जे आयटीआयला प्रथम क्रमांक

बुलढाणा: बोरखेडी मोताळा येथील के बी जे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी 2024 मध्ये सोलर कुलर या प्रकल्पासाठी प्रथम क्रमांक पटकावला आहे. “सौर ऊर्जा ही काळाची गरज” या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाने उपस्थितांचे लक्ष वेधले.

सदर सोलर कुलर दिवसा सौरऊर्जेवर तर रात्री बॅटरीमध्ये साठवलेल्या विद्युत उर्जेवर चालते. विशेष म्हणजे, यामध्ये 13 तासांचा बॅकअप असून सोलर कंट्रोलरमुळे बॅटरी चार्जिंगची टक्केवारी प्रत्यक्षात दिसते. या मिनी सोलर कुलरची किंमत फक्त 3440 रुपये असून भविष्यात असे सोलर कुलर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पासाठी संस्थेतील सोलर टेक्निशियन प्रशिक्षणार्थी मिलिंद सरकटे, प्रज्वल पाटील, सुरज भालेकर, शेख राजिक व कार्तिक जुमडे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना कुमारी श्रद्धा बावनकर, कुमारी आम्रपाली तायडे, श्री गणेश वेरुळकर व श्री पवन सर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या प्राचार्य व समितीने सर्व प्रशिक्षणार्थी व निदेशकांचे अभिनंदन केले. इतर मार्गदर्शकांमध्ये श्री अमोल क्षीरसागर, श्री राहुल राठोड, श्री डी. बी. टहाकळे, श्री अभिलाष सिसोदिया आणि श्री जी. मोरे सर यांचा देखील महत्त्वाचा सहभाग होता.
के बी जे आयटीआयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बुलढाणा जिल्ह्यातून संस्थेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!