
शासकीय अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी – मलकापूर नगरपरिषदेच्या अभ्यासिकेचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे
मलकापूर (प्रतिनिधी) –मलकापूर नगरपरिषदेकडून “40-बिद्या” परिसरात स्पर्धा परीक्षार्थींसाठी शासकीय अभ्यासिका बांधण्यात आली आहे. मात्र, अद्यापही अभ्यासिका सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मलकापूर विधानसभा क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी मा. आमदार चैनसुख संचेती यांना अर्ज सादर करून अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली…