Headlines

उद्या वडनेर भोलजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा.. शिवभक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन!

नांदुरा :- ( उमेश ईटणारे ) राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वडनेर भोलजी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवस्मारक समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उद्या पार पडणार आहे. अनावरण सोहळ्याचे उद्घाटन हुतात्मा संजयसिंह राजपूत यांची वीर पत्नी सौ. सुषमाताई संजयसिंह राजपूत (मलकापूर) यांच्या हस्ते होणार…

Read More

डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; मेहकर तालुक्यातील घटना!

  डोणगाव (ता. मेहकर):- येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या श्रीकृष्ण विजय बनसोड (३५, रा. लोणार) यांनी ९ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे आलेल्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारींनंतर ३ जानेवारी रोजी त्यांच्या दवाखान्यावर धाड टाकून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…

Read More

शेगाव तालुक्यातील टक्कल’ व्हायरस नव्हे तर दूषित पाण्याचा परिणाम, ७० नागरिकांचे पडले टक्कल

शेगाव:-  तालुक्यातील बोंडगाव, काठोरा आणि कालवड या गावांमध्ये तीन दिवसांत ७० हून अधिक नागरिकांचे टक्कल पडल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, पिण्याच्या पाण्यातील अस्वच्छतेमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. गावकऱ्यांना डोक्यात खाज येणे, केस गळणे आणि टक्कल पडण्याचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावांमध्ये घबराट पसरली असून आरोग्य विभागाच्या पथकाने पाहणी…

Read More

चांडक विद्यालयात अभिजात मराठी भाषेचा अभिमान सोहळा..

  मलकापूर: नगर सेवा समिती संचालित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयात दि. 10 जानेवारी रोजी अभिजात मराठी भाषा अभिमान सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनिल खर्चे (इंजिनिअरिंग कॉलेज, मलकापूर) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री शरद देशपांडे सर तसेच, विशेष उपस्थितीत मोहन शर्मा (बुलडाणा जिल्हा लोकसभा समन्वयक),…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते महाविद्यालयात अँटी रॅगिंग सेल अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्

  मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग सेलच्या अंतर्गत पोलिस विभागाच्या सहकार्याने कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) संदीप काळे सर (मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती दिली व त्याबाबत मार्गदर्शन केले. पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात कायद्यांचा अभ्यास कसा करावा व…

Read More

सौ कोमल तायडे यांना युवा उद्योजक पुरस्कार

  दि. ०६ जानेवारी उद्योग व रोजगार निर्मिती क्षेत्रातील सक्रिय योगदानाबद्दल स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या वतीने एस के इंटरप्रायजेस् कंपनीच्या संचालिका सौ कोमल तायडे यांना युवा उद्योजक पुरस्कार २०२४-२५ देऊन सन्मानित करण्यात आले. अद आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त येथील क्रीडा संघटना स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर यांच्यावतीने समाजातील विविध सामाजिक क्षेत्रातील…

Read More

हराळखेड शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला; नैसर्गिक मृत्यूची शक्यता!

इसोली :- बुलढाणा वनपरिक्षेत्रातील उदयनगर वर्तुळातील हराळखेड येथील एका शेतातील नाल्याजवळ ७ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता तीन ते चार वर्षांचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. इसोली येथील रहिवासी शेख रईस शेख मोती यांनी गट क्रमांक ८६ मध्ये बिबट्या मृत असल्याची माहिती वनविभागाला दिली. या माहितीनंतर वनाधिकारी, अमडापूरचे पशुधन विकास अधिकारी व्ही.बी. आवटे आणि…

Read More

गव्हाला पाणी देताना रानडुकरांचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी, मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा :- शेतात गव्हाला पाणी देत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे शेतकरी जखमी झाल्याची घटना कोथळी शिवारात घडली. जखमी हमीदखाँ समशेरखॉ (४६) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना ७ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता घडली. मक्याच्या पिकात लपलेल्या ५ ते ६ रानडुकरांनी अचानक हल्ला चढवून हमीदखाँ यांना जखमी केले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा…

Read More

शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकासाठी संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाची मागणी

  मलकापूर :- पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मलकापूरचे सुपुत्र संजयसिंह भिकमसिंह राजपूत शहीद झाले होते. त्यांच्या सन्मानार्थ मलकापूर येथील माता महाकाली परिसरात विवेकानंद आश्रमजवळ स्मृतीस्मारक उभारण्यात आले आहे. परंतु, या स्मारकाभोवती तारेचे कंपाऊंड किंवा संरक्षण भिंत नसल्यामुळे स्मारकाचे पावित्र्य अबाधित राहत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली…

Read More

पत्रकार दिनानिमित्त पारदर्शक पत्रकारितेला सलाम; अँड हरीश रावळ यांच्यातर्फे उद्या मलकापूरात पत्रकारांचा सन्मान सोहळा!

मलकापूर : निर्भीड आणि निःपक्ष पत्रकारिता करत समाजाला न्यायाची दिशा देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यासाठी पत्रकार दिनानिमित्त गुरुवार, ९ जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या वतीने स्थानिक मराठा मंगल कार्यालयात होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवर: कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख असतील. तसेच माजी…

Read More
error: Content is protected !!