Headlines

मराठा सेवा संघाच्या मलकापूर तालुका कार्यकारिणीची विस्तार

 

मलकापूर:- मराठा सेवा संघ परिवारात सक्रीय असलेल्या प्रत्येकाने आपले मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे श्रम, वेळ, बुध्दी, कौशल्य व पैसा या पंचदानातील जे शक्य असेल ते दान देवून मराठा सेवा संघ ही चळवळ वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा सहसचिव शिवश्री विष्णू म्हैसागर सर यांनी कार्यकारिणी विस्तारप्रसंगी केले.
मराठा सेवा संघाच्या मलकापूर तालुका कार्यकारिणीचा विस्तार जिल्हा संघटक दिलीप अढाव यांच्या मार्गदर्शनात तर तालुकाध्यक्ष शिवश्री रविंद्र खराटे व जिल्हा सहसचिव शिवश्री विष्णू म्हैसागर यांच्या स्वाक्षरीने आज २ जानेवारी रोजी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी विधीसल्लागार म्हणून शिवश्री अ‍ॅड.निलेश तायडे, शिवश्री जेष्ठ सल्लागारपदी प्रकाश खराटे, कोषाध्यक्षपदी शिवश्री नंदकिशोर दाभाडे, कार्याध्यक्षपदी शिवश्री विवेक तायडे, उपाध्यक्षपदी शिवश्री रवि लांडे, सोशल मीडिया प्रसिध्दी प्रमुख पदी शिवश्री योगेश येरळीकर, प्रिंट मीडिया प्रमुखपदी शिवश्री नितीन पवार, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुखपदी शिवश्री गोपाळ रायपुरे, कार्यालयीन सचिव शिवश्री श्रीराम खोडके, विशेष निमंत्रीत सदस्यपदी शिवश्री राहुल वनारे, शिवश्री वैभव गारमोडे, शिवश्री मंगेश जगदाळे, शिवश्री संदीप सारोकार, शिवश्री किरण अहीर आदींची निवड करून कार्यकारिणी विस्तारीत करण्यात आली.
यावेळी शिवश्री पुरूषोत्तम वनारे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील, शिवश्री एस.पी.संबारे सर,शिवश्री सचिन पाटील, शिवश्री दिलीप अढाव सर, शिवश्री उल्हास संबारे सर, शिवश्री चंद्रशेखर पाटील, शिवश्री संजय रहाटे सर, शिवश्री शुभम लाहुडकर, शिवश्री नवल पाटील , शिवश्री गजानन संबारे, शिवश्री मंगेश धोरण, शिवश्री शिवाबापू देशमुख, शिवश्री श्रीराम खोडके, शिवश्री श्रीकृष्ण क्षिरसागर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!