दुचाकी चोरीचा उलगडा; आरोपीला जालना जिल्ह्यातून घेतला ताब्यात; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

चिखली :- शहरातील विश्रामगृह परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकीप्रकरणी चिखली पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला जालना जिल्ह्यातून अटक केली आहे. चोरीस गेलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. २० जानेवारी रोजी हीरो एचएफ डिलक्स (क्र. एमएच-२८-एडब्ल्यू-२५२१) ही दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान सदर वाहन जाफ्राबाद तालुक्यातील भारज बु. येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ धाड टाकून कृष्णा आत्माराम पवार (वय २४) याला ताब्यात घेतले आणि चोरीची दुचाकी जप्त केली. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!