अल्पवयीन मुलगी बेपत्ता; जेसीबी ऑपरेटरवर संशय, गुन्हा दाखल

अंढेरा : – गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात सोलर प्लांटचे काम सुरू आहे. या ठिकाणी जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करणारा मुकेश शामराव मंझा (रा. हरणी, ता. चिखली) हा संबंधित मुलीशी संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. १० फेब्रुवारी रोजी पहाटे मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे तिच्या पालकांच्या निदर्शनास आले. त्याच वेळी संबंधित ऑपरेटरही अनुपस्थित असल्याने कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला.
याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणासंदर्भातील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू असून मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!