खामगाव : नांदुरा रोडवरील श्रीहरी लॉन्स मंगल कार्यालयाला मंगळवार, दि.२४ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारासआग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत आठ ते दहा सिलेंडर जळून भस्मसात झाले. कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याचे समोर येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या अंदाज वर्तविल्या जात आहे. आगीत एका पाठोपाठ एक सिलेंडरचा स्फोट होत असल्यामुळे सुटाळा गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
खामगाव येथील मंगल कार्यालयाला आग; आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट, लाखो रुपयांचे नुकसान
