मलकापूर : शहरातील वकील घनश्याम राजकुमार शर्मा यांना दुचाकीवरून अज्ञात दोन व्यक्तींनी प्लॉट व पैशांसंदर्भात मागणी करत चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. ही घटना काल ८ ऑक्टोबर रोजी सकाळी जुना वाकोडी रोड येथे घडली.मलकापूर येथील न्यायालयातून अॅड. घनश्याम राजकुमार शर्मा (वय ४०, रा बालाजी भवन आदर्श नगर गाडेगाव, मलकापूर) हे ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरून दुचाकीने वानखेडे पेट्रोल पंपकडे जात होते. त्यावेळी जुना वाकोडी रस्ता चौकात विना नंबर प्लेटच्या दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीपैकी एकाने कानाखाली मारली. तर दुसरा व्यक्ती चाकूचा धाक दाखवून म्हणाला की श्यामलाल राजपाल, हिरालाल राजपाल यांचे मालकीचा प्लॉट जो तुम्ही विकत घेतला आहे. तो परत कर अन्यथा एक कोटी रुपये दे. अशा धमक्या देत व अश्लील शिवीगाळ करत अॅड. शर्मा यांना मारहाण केली. मागील दोन महिन्यांपासून वकिल यांना रॉबीन हिरालाल राजपाल यांनी, व्हॉट्सअप फोन, एसएमएस करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागितली.या प्रकरणी हिरालाल राजपाल, रॉबीन राजपाल, श्यामलाल राजपाल व आशीष राजपाल हे जबाबदार राहतील असे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी कलम २९६, ११५, (२) ३५१ (२) ९२ बी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.