आश्रय दिला आणि संकट ओढावले; नशेत धुंद आरोपीचा वृद्धावर कोयत्याने हल्ला!

 

चिखली :- चिखली तालुक्यातील सावंगी गवळी येथे दारूच्या नशेत एका व्यक्तीने घरात घुसून ६५ वर्षीय वृद्धावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकारात वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अनंता नंदू तांगडे हा आपल्या भावाच्या पत्नीला मारहाण करण्यासाठी तिचा पाठलाग करीत होता. जीव वाचविण्यासाठी संबंधित महिला पांडुरंग बाबूराव डोंगरे (वय ६५) यांच्या घरी आश्रयासाठी गेली. त्यानंतर तांगडे हा दारूच्या नशेत डोंगरे यांच्या घरात घुसला.
घरात घुसल्यानंतर त्याने शिवीगाळ करत डोंगरे यांना मारहाण केली आणि कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात डोंगरे गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून प्रकार शांत केला. जखमींना प्रथम चिखली येथे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले. उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर डोंगरे यांनी अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!