शेगाव : – शहरातील एका परिसरात अल्पवयीन तरुणीचा हात पकडून जबरदस्तीने लग्नाचा आग्रह धरण्याचा आणि तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, अनिकेत बाबूराव खेर्डे (रा. जुने महादेव मंदिर परिसर, शेगाव) याने तरुणीचा हात पकडून लग्नासाठी दबाव टाकला तसेच तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. आरोपीने यापूर्वीही तरुणीचा पाठलाग करून धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत शेगाव पोलिसांनी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
