दगडूशेठ हलवाईच्या रूपात गौरीपुत्र नगरात बाप्पा विराजमान
मलकापूर : शहरातील गौरीपुत्र नगरात यंदा पहिल्यांदाच श्री. गौरीपुत्र गणेश मंडळाच्या वतीने गणपती बाप्पा मोठ्या उत्साहात बसवण्यात आला आहे. मंडळाने यावर्षी पुण्याच्या प्रसिध्द व श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात बाप्पाला प्रतिष्ठापना दिली आहे. संस्थापक अध्यक्ष रितेश दहिभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून, गणेशोत्सव काळात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रम व समाजोपयोगी उपक्रम…
