Headlines

हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती प्रभात फेरी व पथनाट्याचे आयोजन

मलकापूर:- माननीय उपविभागीय अधिकारी मलकापूर तथा 21 मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे स्वीप नोडल अधिकारी एन जे फाळके, सहा.नोडल अधिकारी एन बी शिंदे, आर एम वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हिराबाई संचेती कन्याशाळा मलकापूर या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वीप कार्यक्रमांतर्गत मलकापूर शहरांतर्गत शिवाजीनगर आणि तहसील चौक या भागात पथनाट्य घेऊन तसेच रॅली काढून…

Read More

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर कराल तर होईल कारवाई, ग्रुप ॲडमिन ने सेटिंग बदलण्याची गरज!

मलकापूर :केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. या काळात सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ग्रुपवर वादग्रस्त वक्तव्य, पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ छेडछाड करून ते व्हायरल केले जातात. यामुळे वाद होण्याची शक्यता असते. एखाद्या सदस्याने जरी वादग्रस्त मेसेज केला, तर ग्रुप अॅडमिनवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे अॅडमिनने आजच सेटिंग बदलण्याची गरज आहे. शिवाय…

Read More

आमचं ठरत नसत आमचं फिक्स असत; काँग्रेस कडून आमदार राजेश एकडे यांची उमेदवारी जाहीर!

मलकापूर:- केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. या मध्ये 48 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मध्ये मलकापूर नांदुरा मतदारसंघातुन विद्यमान आमदार राजेश…

Read More

मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बना लेना, मै समंदर हु, लोटके वापस आऊंगा; चैनसुख संचेती यांना भाजप कडून उमेदवारी जाहीर होणार ? विश्वसनीय सूत्रांची विदर्भ लाईव्ह ला माहिती

मलकापूर ( उमेश इटणारे ): भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील तीनही भाजपाच्या विद्यमान आमदारांची नावे असून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश नसल्याने मलकापूर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण? अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली होती. मलकापूर मतदार संघात मनीष लखानी यांच्या नावाची चर्चा सुरू होती….

Read More

पेपर देऊन शाळे बाहेर दुकानात गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीला दुचाकी चालकाने फरफटत नेले; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- पेपर देऊन शाळे बाहेर दुकानात गेलेल्या चिमुकल्या मुलीला दुचाकी चालकाने फरफटत नेत अपघात झाल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास नूतन इंग्लिश स्कूलच्या गेट समोर घडली. या अपघातात 10 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली. अपघात घडताच स्कूल मधील शिक्षक घटनास्थळी पोहचून त्या विद्यार्थिनीला खाजगी रुग्णालयात दाखल केले. या बाबत सविस्तर वृत्त असे की भाग्यश्री…

Read More

भाजप कडून मनीष लखानी यांना उमेदवारी जाहीर?

मलकापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील तीनही भाजपाच्या विद्यमान आमदारांची नावे असून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश नसल्याने मलकापूर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण? अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपाच्या वाट्याला चार जागा असून त्यापैकी त्यामध्ये मलकापूर,…

Read More

अतिवृष्टीमुळे नदी काठावरील घरांचे व मालमत्तेचे नुकसान झालेल्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ द्या मागणी

    मलकापूर :- दि. ११ व १२ ऑक्टोबर रोजी मलकापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी काठावरील घरांचे व मालमत्तेचे नुकसान झालेले सानुग्रह अनुदानापासून वंचित असलेल्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान मिळवे यासाठी वरील विषयास अनुसरून आपणाकडे सविनय निवेदन सादर करण्यात येते की, गत् ११ व १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मलकापूर शहरासह परिसरामध्ये अतिवृष्टीसदृष्य मुसळधार पाऊस झाला. त्यातच…

Read More

महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आपादग्रस्तांना तातडीने अर्थसहाय देण्यात यावे – अशांतभाई वानखडे यांची मागणी

मलकापूर (प्रतिनिधी) – महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आपादग्रस्तांना तातडीने अर्थसहाय देण्यात यावे अशी मागणी आज २१ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ ऑक्टोबर रोजी नळगंगा धरण मोठा प्रकल्प पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली…

Read More

डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर विद्यार्थ्यांच्या चमुने रसायनशास्त्र स्पर्धेमध्ये पटकावला प्रथम क्रमांक

  मलकापूर :- स्थानिक विज्ञान महाविद्यालय मलकापूर यांच्या रसायनशास्त्र विभागामार्फत तालुकास्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा 19 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे आयोजन विज्ञान महाविद्यालयातील पी.जी. केमिस्ट्री असोसिएशनने केले होते. या स्पर्धेत डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर डॉ.व्ही.बी. कोलते कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मलकापूर व आयोजक विज्ञान महाविद्यालय मलकापूरच्या तीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी…

Read More

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांची यशस्वी औद्योगिक भेट

मलकापूर: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या मेकॅनिकल विभागाने विद्यार्थ्यांना उद्योगातील व्यावसायिक ज्ञान मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तीन प्रमुख उद्योगांना भेट दिली. विद्यार्थ्यांनी प्रथम भेट दिली आयजीटीआर छत्रपती संभाजीनगर येथे श्री. अनिकेत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उद्योगातील वास्तविक उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना डिझाईनपासून अंतिम उत्पादनापर्यंतच्या सर्व टप्प्यांची सविस्तर…

Read More
error: Content is protected !!