Headlines

बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरातून बॅटरी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

बुलढाणा :- बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरातून बॅटरी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली, जेव्हा जनरेटर सुरू करण्यासाठी कर्मचारी गेले. तेव्हा जनरेटरची बॅटरी गायब असल्याचे लक्षात आले. या घटनेबाबत भूषण चोपडे यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.चोरी नेमकी…

Read More

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत के बी जे आयटीआयला प्रथम क्रमांक

बुलढाणा: बोरखेडी मोताळा येथील के बी जे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी 2024 मध्ये सोलर कुलर या प्रकल्पासाठी प्रथम क्रमांक पटकावला आहे. “सौर ऊर्जा ही काळाची गरज” या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाने उपस्थितांचे लक्ष वेधले. सदर सोलर कुलर दिवसा सौरऊर्जेवर तर रात्री बॅटरीमध्ये साठवलेल्या विद्युत उर्जेवर चालते. विशेष म्हणजे, यामध्ये 13 तासांचा बॅकअप…

Read More

नववर्षाची दिलखुलास भेट; बुलढाणा पोलीस दलातील ४७ जणांना पदोन्नती!

  बुलढाणा :- बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील ४७ अंमलदारांना पदोन्नतीचे गिफ्ट दिले. या अंतर्गत १९ हेड कॉन्स्टेबलना सहायक पोलीस उपनिरीक्षक, तर २७ पोलीस नाईकांना हेड कॉन्स्टेबल पदावर पदोन्नती देण्यात आली.पदोन्नतीसह ईच्छित स्थळी बदलीचा पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पानसरे यांनी पद्भार स्विकारल्यापासून पोलीस दलातील कार्यक्षमता…

Read More

नायलॉन मांजावर बुलढाणा जिल्ह्यात बंदी; जीवितहानी आणि पर्यावरणासाठी प्रशासनाकडून कठोर पावले

बुलढाणा :- मकर संक्रांतीच्या कालावधीत पतंगबाजीचा उत्साह वाढत असतो. यावेळी मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा वापर केला जातो, जो मानवी जीव, पशु-पक्षी यांच्यासाठी प्राणघातक ठरत आहे. अशा घटनांमुळे जखमी आणि मृत्यूंच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ नुसार, बुलढाणा जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरावर, विक्रीवर आणि निर्मितीवर कडक बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व घाऊक…

Read More

दुकानदारांसाठी इशारा; वस्तू परत घेण्यास नकार दिल्यास होऊ शकतो दंड व कारावास!

  ( वृतसंस्था ) नवी दिल्ली: ‘राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन’ नुकताच साजरा झाला. या निमित्ताने ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एक महत्त्वाचा हक्क म्हणजे “पसंत न पडलेली वस्तू दुकानदारास परत देण्याचा अधिकार.”अनेकदा दुकानदार “एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही” अशा प्रकारच्या सूचना लावतात. मात्र, असे करणे बेकायदेशीर आहे. ग्राहक संरक्षण कायदा-२०१९…

Read More

बीडी पितांना कपड्यांना आग, आगीत होरपळून मनोरुग्णाचा मृत्यू, लोणार येथील रुग्णालयातील धक्कादायक घटना!

लोणार :- येथील ग्रामीण रुग्णालयात काल रात्री एक दुर्दैवी घटना घडली. उपचारा करिता आणलेल्या एका मनोरुग्णाच्या कपड्यांना बिडी पितांना जनरल वॉर्डमध्ये आग लागून आगीत एका मनोरुग्णाचा होरपळून मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव हरिभाऊ रोकडे असून तो पैठण येथील रहिवासी होता. २२ डिसेंबर रोजी लोणार बसस्थानकावर अत्यवस्थ अवस्थेत सापडलेल्या या मनोरुग्णाला अॅम्बुलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले होते….

Read More

स्कूल बस व दुचाकीची धडक, २१ वर्षीय युवक ठार

बुलढाणा:- तालुक्यातील खुपगाव येथील २१ वर्षीय जीवन मुकुंदा इंगळे याचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहराजवळील आश्रम शाळेजवळ घडली. जीवन इंगळे हे बुलढाणा येथील एका हेअर सलून मध्ये काम करत होते. बुधवारी सकाळी ते दुचाकीने कामावर जात होते, त्याचवेळी शिवसाई ज्ञानपीठ शाळेची बस साखळीकडे जात…

Read More

तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा!

मंगरुळ नवघरे :- येथील तरुण गोविंद सुरेश गायकवाड वय २६ वर्ष रा. मंगरूळ नवघरे हा बाबुळगाव शिवारांमधील त्याच्या शेताला लागून असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी १० वाजताच्या उघडकीस आले. येथील शेतकरी संतोष छगन वाकडे हा सकाळी शेतामध्ये चक्कर मारत असताना एका आंब्याच्या झाडाला गोविंद गायकवाड हा गळफास घेऊन दिसून आल्यानंतर त्यांनी मंगरूळ येथील दीपक…

Read More

लोणार शहरातील शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, 4 शेळ्या ठार, परिसरात भीतीचे वातावरण!

लोणार (५ डिसेंबर) : लोणार शहरातील सार्वजनिक विश्रामगृहाच्या मागील भागात असलेल्या प्रकाश रामराव मापारी यांच्या गोठ्यात ५ डिसेंबरच्या रात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ४ शेळ्या ठार झाल्या, ज्यामुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचारी, आरएफओ अंकुश येवले, वनपाल कायंदे आणि वनरक्षक कैलास चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. वनविभागाकडून लवकरच…

Read More

स्टेट बँक जवळ ऑटो चालकाला लुटले; तिघांवर गुन्हा दाखल; बुलढाणा शहरातील घटना

बुलढाणा: शहरातील स्टेट बँक ते जयस्तंभ चौकादरम्यान एका ऑटो चालकाला लुटल्याची घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. तीन आरोपींनी चालकाच्या खिशातील ४०० रुपये जबरदस्तीने काढून पोबारा केला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार योगेश रावसाहेब भालेराव (३६, रा. सम्यक नगर, सुंदरखेड) यांनी सांगितले की, तुळशीनगरमधून प्रवासी घेऊन जात असताना…

Read More
error: Content is protected !!