मलकापूरच्या अब्दुल हमीद चौकात क्षुल्लक कारणावरून दोन समाजात दगडफेक; पोलिसांचा मोठा बंदोबस्त! परिसराला छावणीचे स्वरूप

मलकापूर : – शहरातील अब्दुल हमीद चौक परिसरात लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ वादातून काही जणांमध्ये वाद वाढत गेला आणि त्यानंतर परिसरात दगडफेक झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने अब्दुल हमीद चौक परिसरात जमा झाले होते. त्यामुळे परिसरात काही…

Read More

मलकापुरात कथित अनैतिक प्रकाराच्या संशयावरून महिलेला मारहाण; नागरिकांच्या संतापामुळे परिसरात तणाव

  मलकापूर :- शहरातील मध्यवर्ती वस्तीत कथित अनैतिक व्यवहार सुरू असल्याच्या संशयावरून संतप्त नागरिकांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना बुधवारी (५ मार्च) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या भागातील एका खासगी इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या घरात काही दिवसांपासून बाहेरून महिलांना बोलावले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू होती….

Read More

बीबी येथे शिक्षकाच्या घरात दिवसा घरफोडी; आरोपीस रंगेहाथ अटक

दुसरबीड : बीबी येथे शिक्षकाच्या बंद घरात दिवसा घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला घरातच रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले. ही घटना ४ मार्च रोजी दुपारी घडली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीबी येथील रहिवासी तथा खापरखेड येथील शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत नंदाजी कांगणे हे ४ मार्च रोजी सकाळी शाळेत गेले होते. त्यांच्या…

Read More

आईशी शेवटचा संवाद… आणि समोरच उडी; ३९ वर्षीय युवकाची हृदयद्रावक आत्महत्या

चांडोळ (ता. बुलढाणा) : आईला “हा आपला शेवटचा संवाद आहे” असे फोनवर सांगितल्यानंतर काही क्षणांतच आई-भावाच्या डोळ्यादेखत आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन ३९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना धाड परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धाड ता. बुलढाणा येथील रहिवासी ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (वय ३९) यांची धाड येथील भाग क्रमांक-१, गट क्र….

Read More

युद्धजन्य परिस्थितीत परदेशातील बुलढाणेकरांची माहिती द्या; प्रशासनाचे नातेवाईकांना तातडीचे आवाहन

बुलढाणा : – मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली असून, त्या देशांत वास्तव्यास असलेल्या किंवा अडकले असल्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्व तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून, संबंधित नागरिकांची नावे, पत्ते व संपर्क तपशील गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात…

Read More

आश्रय दिला आणि संकट ओढावले; नशेत धुंद आरोपीचा वृद्धावर कोयत्याने हल्ला!

  चिखली :- चिखली तालुक्यातील सावंगी गवळी येथे दारूच्या नशेत एका व्यक्तीने घरात घुसून ६५ वर्षीय वृद्धावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकारात वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अनंता नंदू तांगडे हा आपल्या भावाच्या पत्नीला मारहाण करण्यासाठी तिचा पाठलाग करीत होता. जीव वाचविण्यासाठी संबंधित…

Read More

सेवानिवृत्तांच्या पैशांवर भ्रष्टाचाराचा पंजा; कोषागार अधिकाऱ्यांची लाच घेताना धरपकड!

  बुलढाणा : – जिल्हा कोषागार कार्यालयातील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले असून, पेन्शन मंजुरीसाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मुंडे, कनिष्ठ लेखापाल विनोद घट्टे आणि कनिष्ठ लिपिक जीवन काळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पेन्शन प्रकरणाला मंजुरी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार…

Read More

देऊळगाव कुंडपाळ येथे गोशाळेत बिबट्याचा शिरकाव; गायीचा मृत्यू, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

देऊळगाव कुंडपाळ : – लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्प परिसरातील पांडुरंग गोसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या गोशाळेत २० फेब्रुवारीच्या मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून एका गायीचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. गोशाळेत सुमारे ७० गायी व दोन बैल बांधलेले होते. त्यापैकी पाच गायी दुभत्या असून वासरे शेजारील जागेत ठेवण्यात आली होती. रविवारी (दि. २१) सकाळी गोशाळेचे…

Read More

धाडमध्ये गुंडगिरीला आळा बसणार? आरोपींची पोलिसांकडून धिंड

  बुलढाणा : – धाड परिसरात व्यावसायिकांना धमकावून हप्ता उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित आरोपींना सोमवारी गावातील मुख्य मार्गावरून फिरवून कायद्याचा धाक दाखवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दुधा येथील पवन राजेंद्र सोनुने हे धाड येथे औषधांचे दुकान चालवितात. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते दुकानाकडे जात असताना चौघांनी…

Read More

देऊळघाट मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, चार विद्यार्थी जखमी

  बुलढाणा : – देऊळघाट मार्गावर मंगळवारी सायंकाळी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात ३८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातावेळी वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळघाट येथील गोविंदा पसरटे हे विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणारे वाहन चालवितात. १६ फेब्रुवारी रोजी…

Read More
error: Content is protected !!