Headlines

दारूच्या नशेत मुलाने आईला जिवंत पेटविले, आरोपी अटकेत; संग्रामपूर तालुक्यातील घटना!

  संग्रामपूर (दि. ९) – दारूच्या नशेत स्वतःच्या आईला जिवंत पेटविल्याची धक्कादायक घटना पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथे घडली. गौरव देशमुख याने ‘तू घातलेली साडी मला हवी’ म्हणत आई मीनाबाई यांच्या कपड्यांना आग लावली. यात त्यांचे पाय व तळपाय भाजले असून त्यांच्यावर शेगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी…

Read More

चोरटे भले हुशार; खिडकीतून घरात प्रवेश केला अन ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला.. शेगाव तालुक्यातील वरुड येथील घटना!

  खामगाव: शेगाव तालुक्यातील वरूड येथे चोरट्यांनी घरफोडी करत ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषीकेश पंजाबराव कोकाटे यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातून त्यांनी मुख्य दरवाज्याची कडी तोडून कपाटातील रोकड, दागिने आणि दोन मोबाईल चोरले. चोरीस गेलेल्या मालामध्ये ५० हजार रुपये रोख, १५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि दोन…

Read More

उमाळी-वरखेड रस्त्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी!

  मलकापूर :- तालुक्यातील उमाळी-वरखेड रस्त्यावर 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अरुण राजाराम तडके (55, वरखेड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरजपाल सुभाषसिंह राजपूत (34) आणि अर्जुन मानसिंह राजपूत (17, उमाळी) गंभीर जखमी झाले. अरुण तडके हे MH 28 AA 7652 क्रमांकाच्या…

Read More

जागेच्या वादातून हाणामारी; तिघांवर गुन्हा दाखल, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील कंझारा येथे जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारींवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की २९ जानेवारी रोजी संतोष फकीरा शेगोकार यांनी प्रभाकर पंढरी शेगोकार यांना घराच्या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत…

Read More

उज्जैनहून दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात – एक ठार, तिघे गंभीर जखमी, नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील घटना!

  नांदुरा:- तालुक्यातील वडनेर येथे उज्जैनहून दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक युवक जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना (२८ जानेवारी) पहाटे ५ वाजता घडली. खामगाव येथील रोशन अनिल ठाकरे, प्रतीक कैलास अवधूत, अक्षय वसंता कळसकर आणि अमन पुरवार हे स्विफ्ट डिझायर (MH 14 FC 0284) कारने…

Read More

अज्ञात वाहनाची ऑटोला जबर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी, राष्ट्रीय महामार्ग 53 वरील रणथम येथील घटना!

  मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रणथम येथे भरधाव अज्ञात वाहनाने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू झाला असून ऑटोचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी सहाच्या सुमारास घडली. कुलमखेल येथील रहिवासी राजू उर्फ राजेश रमेश चौथे (५४) हे आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत…

Read More

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.. मोताळा तालुक्यातील घटना

  मोताळा :- तालुक्यातील पान्हेरा (खेडी) येथील रामेश्वर विश्वनाथ राहणे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामेश्वर राहणे यांची सहा एकर शेती गट क्रमांक १९८ व १९९ मध्ये आहे. मात्र, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचा खर्चही न निघाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक, को-ऑपरेटिव्ह बँक आणि…

Read More

विहीरीत सापडला मृत बिबट्या, शिकार करताना विहिरीत पडल्याचा संशय.. मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील घटना!

  मुक्ताईनगर:- तालुक्यातील भोटा शिवारात एका विहिरीत बिबट्याचा मृतदेह सापडला आहे. शिकारीचा पाठलाग करत असताना तो विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भोटा येथील गट क्रमांक ८१ मधील शेतकरी रायबा तुळसीराम मोरे बुधवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. त्यांनी दुर्गंधीचा उगम शोधण्यासाठी विहिरीकडे पाहिले असता पाण्यात बिबट्याचा मृतदेह तरंगताना…

Read More

अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग 53 वरील वडी जवळील घटना!

  नांदुरा :- तालुक्यातील वडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात ऋषिकेश शंकर खराटे (वय ४०, रा. माटोडा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता ऋषिकेश खराटे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ नांदुरा येथील रुग्णालयात नेण्यात आले….

Read More

शेतकऱ्यांच्या मक्याच्या गंजीला आग, एक लाखाचे नुकसान, मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील घटना!

  मलकापूर:- तालुक्यातील बेलाड येथील शेतकऱ्याच्या शेतातील मक्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १६ जानेवारी रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी २१ जानेवारी रोजी अज्ञाताविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांत या भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर आणि कुटार यांच्या गंजींनाही आग लागण्याच्या घटना वारंवार…

Read More
error: Content is protected !!