Headlines

विष प्राशन केल्याने 42 वर्षीय महिलेचा मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव (प्रतिनिधी) – हिंगणा उमरा (ता. खामगाव) येथील एका ४२ वर्षीय महिलेने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रजनी विजय जुमडे यांनी २० फेब्रुवारी रोजी अज्ञात कारणाने विष सेवन केले. प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या…

Read More

बारदाना गोदामाला आग, ३० लाखांचे नुकसान; खामगाव शहरातील घटना!

खामगाव: स्थानिक भडगुर्जी जिन भागातील पाडिया यांच्या बारदाना गोदामाला काल पहाटे अचानक आग लागल्याने अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. भडगुर्जी जिन भागात “अमेझर ट्रेडिंग कॉर्पोरेशन” या नावाने बारदान्याचे गोदाम आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच नगरपरिषद अग्निशमन दल…

Read More

गॅस सिलिंडरचा स्फोट; तिघेजण गंभीर जखमी; खामगाव शहरातील घटना!

खामगाव: स्थानिक मेहबूब नगर भागात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बुधसन कुटुंबीय कॉटन कँडी (बुड्डी के बाल) व्यवसाय करतात. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे कॉटन कँडी तयार करत असताना घरगुती गॅस सिलिंडर गळतीमुळे अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत मुकेशकुमार बुधसन (४०), योगेशकुमार बुधसन (२५) आणि सोनुकुमार बुधसन (२०) हे तिघे गंभीर जखमी…

Read More

खामगाव-बाळापूर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खामगाव: अपघातांच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक दुर्दैवी घटना आज (8 फेब्रुवारी) दुपारी घडली. बाळापूर-खामगाव महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये संतोष शर्मा (रा. अकोला) यांचा जागीच मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, संतोष शर्मा एमएच 28-बीएस 2240 या क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. अपघात कशामुळे झाला याची स्पष्ट माहिती मिळालेली नाही, परंतु त्यांच्या डोक्यावरून वाहन गेल्याने…

Read More

१७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून छळ; युवकावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, खामगाव शहरातील घटना!

  खामगाव – शहरातील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या १९ वर्षीय युवकावर पोलिसांनी विनयभंग आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित विद्यार्थिनी शहरातील एका शाळेत दहावीत शिक्षण घेत असून, गेल्या वर्षभरापासून प्रथमेश प्रभाकर चितोळे (वय १९, रा. सुटाळा बुद्रुक) हा तिचा सतत पाठलाग करीत होता. अखेर ४ फेब्रुवारी रोजी संत…

Read More

जागेच्या वादातून हाणामारी; तिघांवर गुन्हा दाखल, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील कंझारा येथे जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारींवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की २९ जानेवारी रोजी संतोष फकीरा शेगोकार यांनी प्रभाकर पंढरी शेगोकार यांना घराच्या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत…

Read More

विष प्राशन करून 24 वर्षीय तरुणाने संपवली जीवन यात्रा, खामगाव येथील घटना!

  खामगाव :- स्थानिक शंकर नगर भागात २१ जानेवारीच्या रात्री २४ वर्षीय अभय सुनील सोनोने यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेचा उलगडा दुसऱ्या दिवशी सकाळी झाला, तेव्हा कुटुंबियांनी तातडीने त्यांना सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके…

Read More

झोपलेल्या इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन व पैसे लंपास.. तिघांवर गुन्हा दाखल; खामगाव शहरातील घटना

  खामगाव :- येथील बाळापुर नाका परिसरातील अजय हॉटेलसमोर १७ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला. निलेश वसंतराव गव्हाळ (४१, रा. जगदंबा रोड) हे रात्री १२.३० वाजता बाजीवर झोपले होते. मध्यरात्री १.३० वाजता जाग आल्यावर त्यांना त्यांच्या गळ्यातील ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ५० हजार रुपये रोख व मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. चोरीचा…

Read More

तोल गेल्याने विहिरीत पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव, दि. १४ (प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील ढोरगाव येथे १३ जानेवारी रोजी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत पवन विलास टिकार (वय २५) या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पवन हा सायंकाळी घरासमोरील विहिरीवर गेला होता. दरम्यान, अचानक तोल गेल्याने तो थेट विहिरीत पडला. ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी धाव घेतली आणि तात्काळ मदतकार्य सुरू…

Read More

नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला, खामगाव येथील घटना!

  खामगाव, दि. १४ (प्रतिनिधी) – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीचा उत्साह चांगलाच वाढला आहे. मात्र, यासोबतच घातक नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांना गंभीर दुखापती होत असून खामगाव शहरात याचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे.भुसावळ चौक येथे १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकीस्वार शेख करीम यांच्या गळ्याला नायलॉन…

Read More
error: Content is protected !!