सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू; रुग्णवाहिकेवर नातेवाइकांचे गंभीर आरोप!

खामगाव :- पकडलेला साप जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामगावजवळील जनुना येथे सोमवारी (दि. 9 ) दुपारी घडली. मंगेश प्रकाश कांबळे (वय 32 ) असे मृतक सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात पकडलेला साप सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी मंगेश कांबळे हे जनुना तलाव परिसरात गेले होते. यावेळी सापाने अचानक त्यांना दंश केला….

Read More

नॅशनल हायस्कूलसमोर चाकू दाखवत दहशत; दोघांविरुद्ध गुन्हा!

खामगाव : – शहरातील नॅशनल हायस्कूलसमोर चाकू दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी गौतम मोहन इंगळे (रा. वरखेड खुर्द, ता. शेगाव) यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, नॅशनल हायस्कूलसमोरील रस्त्यावर काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे…

Read More

५० हजारांच्या बदल्यात पाच लाख; ‘बच्चो की बँक’च्या नकली नोटा देऊन एकाची फसवणूक!

  खामगाव : – पन्नास हजार रुपये दिल्यास पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर येथील एका अभ्यासिका चालकाची फसवणूक करण्यात आल्याची घटना खामगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. आरोपींनी ५०० रुपयांसारख्या दिसणाऱ्या ‘बच्चो की बँक’ असे लिहिलेल्या नकली नोटांचे बंडल देऊन त्यांना लुबाडले. गणेश रविंद्र सोनवणे (वय २४, रा. गोकुळवाडी, औरंगपुरा, ज्योतिबा फुले चौक,…

Read More

पैशांच्या मागणीवरून मानसिक-शारीरिक छळ; आठ जणांवर खामगाव पोलिसांत गुन्हा दाखल!

  खामगाव :- प्लॉट खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २० फेब्रुवारी रोजी करण्यात आली. हरीफैल परिसरातील मीना राहुल खरात (वय २८) यांचा विवाह जालना जिल्ह्यातील खांडसरी लालबाग येथील राहुल खरात (वय ४२) याच्यासोबत झाला होता. तक्रारीनुसार,…

Read More

बंद घर फोडून ६४ हजारांची रोकड चोरी; खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव : – तालुक्यातील कोलोरी गावात बंद घर फोडून ६४ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सोनाजी अंभोरे (वय २४, रा. कोलोरी) हे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घराला कुलूप लावून बाहेर…

Read More

मला पैशांसाठी त्रास देत आहेत; चिट्ठीत उल्लेख, खामगाव तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या!

  खामगाव : – तालुक्यातील वाडी येथे सावकारी व्यवहार व शेती संदर्भातील आर्थिक वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत शेतकरी भास्कर लक्ष्मण तायडे (रा. वाडी) यांनी राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी…

Read More

पाच वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल, खामगाव शहरातील घटना!

  खामगाव : – शहरातील सतीफैल परिसरात अल्पवयीन बालिकेसोबत गैरवर्तन केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांची बालिका ही घराशेजारी राहणाऱ्या संतोष रामदास पवार (वय ५०) यांच्या घरी खेळण्यासाठी जात असे. १४ फेब्रुवारी रोजी…

Read More

प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन कुटुंबांत तणाव; मुलासह आईवर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा

खामगाव : प्रेमसंबंधाच्या कारणावरून तालुक्यातील पेंडका पातोंडा येथे दोन कुटुंबांमध्ये तीव्र वाद निर्माण होऊन मुलासह त्याच्या आईवर लोखंडी रॉड व काठीने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण मोरखडे रा. गोळेगाव…

Read More

गांजाची चोरटी विक्री करणारा रंगेहाथ जेरबंद; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खामगाव ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

खामगाव : परिसरात अंमली पदार्थांची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी खामगाव ग्रामीण पोलिसांनी कंबर कसत मोठी कारवाई केली आहे. ग्राम अटाळी येथे गांजाची चोरटी विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत एका इसमास रंगेहाथ अटक केली. या कारवाईत सुमारे ९२४ ग्रॅम गांजा व रोख रक्कम असा एकूण १९,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरोधात…

Read More

प्रेमाची कहाणी रक्तरंजित शेवटी संपली; साखरखेर्डाच्या प्रेमीयुगुलांचा दुर्दैवी अंत खामगावात हत्याकांड!

खामगाव ( दिपक इटणारे ):- प्रेमाचा शेवट इतका भीषण असेल, याची कुणालाच कल्पना नव्हती…! प्रेमकहाणीचा गोडवा एका क्षणात रक्तरंजित वळणावर जाऊन संपला. दोन हृदयं, जी एकमेकांसाठी धडधडत होती, तीच अखेरच्या क्षणी एकमेकांच्या विरुद्ध उभी ठाकली. खामगाव शहराला हादरवणारी ही थरारक घटना घडली जुगनू हॉटेलमध्ये. साखरखेर्डा परिसरातील प्रियकर–प्रेयसीच्या या नात्याचा शेवट चाकूच्या वारात झाला. ऋतूजा पद्माकर…

Read More
error: Content is protected !!