सेवानिवृत्तांच्या पैशांवर भ्रष्टाचाराचा पंजा; कोषागार अधिकाऱ्यांची लाच घेताना धरपकड!

 

बुलढाणा : – जिल्हा कोषागार कार्यालयातील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले असून, पेन्शन मंजुरीसाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मुंडे, कनिष्ठ लेखापाल विनोद घट्टे आणि कनिष्ठ लिपिक जीवन काळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पेन्शन प्रकरणाला मंजुरी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करून पथकाने सापळा रचला आणि ठरलेली रक्कम स्वीकारताना तिघांना पकडले. विशेष म्हणजे, संबंधित अप्पर कोषागार अधिकारी नुकतेच पदावर रुजू झाले होते. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पेन्शनसाठीही लाच मागितल्याचा आरोप झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू असून, कोषागार विभागातील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. ACBकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!