मलकापूर ( उमेश इटणारे ) :- मलकापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा दणका सुरू झाला आहे मात्र या भूमिपूजन सोहळ्यात शहरी भागाचा तसेच मतदारसंघातील अल्पसंख्यांक वस्तीतील विकास कामांचा विद्यमान आमदाराला विसर पडल्याने मतदार संघात नाराजी व्यक्त केली जात आहे. पाच वर्षात काहीसा विकास सॊडला तर शहरात व अल्पसंख्याक भागात कोणतेही विकासकामे झाले नसल्याचे दिसून येत आहे. विकास झाला नसल्याचे मतदाता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. पाच वर्षा आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार एकडे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण मलकापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली. मलकापूर तालुक्यातील काँग्रेसचे मोठे नेते हाताशी धरून विद्यमान आमदारांनी संपूर्ण मलकापूर तालुक्यात जोरदार प्रचार केला. या प्रचारादरम्यान शहरात व गावागावात विकासाचे मोठमोठे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पाच वर्ष उलटून गेली असतानाही मतदार संघात व मलकापूर शहरातील अल्पसंख्याक भागात विकास न झाल्याने अल्पसंख्याक भागातील नागरिकांची नाराजी दिसून येत आहे. मलकापूर मतदार संघात निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपासून कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सुरू आहे. मात्र या भूमिपूजनामध्ये अल्पसंख्याक भागातील वस्तीकडे दुर्लक्ष करीत भूमिपूजन सोहळा केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत अल्पसंख्याक भागातील जनता विद्यमान आमदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ही तेवढेच खरे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांनी अल्पसंख्यांक तसेच शहरी भागाचा घवघवीत विकास करण्याचे मोठमोठे आश्वासन मतदारांना दिले होते. मात्र आजही परिस्थिती `जैसी थे” आहे. मलकापूर शहरातील पारपेट भागामध्ये अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या अनेक रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गेल्या पावसाळ्यामध्ये स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पारपेट भागातील स्वतंत्र पाण्याच्या टाकीसह अनेक मूलभूत सुविधा पुरवण्याचे मोठमोठे आश्वासन विद्यमान आमदारांनी दिले होते मात्र ते अद्यापही पूर्ण करू न शकल्याने पारपेट भागातील मतदारांमध्ये विद्यमान आमदार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नांदुरा येथील रेल्वे गेट येथे मोठा उड्डाणपूल, तसेच नांदुरा येथे एम.आय.डी.सी. याचबरोबर अनेक मोठमोठे आश्वासन नांदुरा येथील मतदारांना देण्यात आले होते मात्र त्या ठिकाणी ही फक्त ग्रामीण भागाचा छोटा मोठा विकास झाल्याचे दिसून येत आहे यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदार यांना मतदार आपली जागा दाखवून देणार असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भूमिपूजन
एन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील ग्रामीण भागातील झालेल्या कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा सुरू असल्याने ग्रामीण भागातील मतदारांना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे हा आमिष दाखवण्याचा प्रकार असल्याची चर्चा ग्रामीण भागातील मतदारांमध्ये सुरू आहे.