
शेतात काम करतांना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील उमरा अटाळीतील घटना!
खामगाव:- खामगाव तालुक्यातील उमरा अटाळी येथे शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. राजेंद्र महादेव राऊत (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या शेतात गेले होते. शेतातील विहिरीजवळ वाढलेले गवत कापत असताना…