मलकापूर :- अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव व त्यांचे सहकारी दिव्यांग पदधिकारी यांनी बूलढाणा जिल्हाधिकारी व मूख्य कार्यकारी अधिकारी यांना नीवेदन देऊन शासन निर्णय नुसार जिल्हा परीषद, पंचायत समिती व ग्रामस्तरावरील दिव्यांगाच्या नोंदी कोरोना काळापासुन झालेल्या नसुन, सदर नोंदी आजरोजी अदयावत करुन व वर्गवारी करुन असर्मथ व बहुदिव्यांग दिव्यांगाच्या नोंदी तात्काळ घेण्यात याव्या. निर्णयात नमुद स्थानीक स्वराज्य संस्थांनी स्वउत्पन्नातील दिव्यांगासाठी राखून ठेवलेल्या ५ टक्के निधी साहीत्याची खरेदी न करता थेट रोख स्वरुपात लाभ्यार्थ्याचा खात्यात थेट जमा करण्याबाबत शासन निर्णयात नमुद असल्याने दिव्यांगाना वस्तु स्वरुपात लाभाचे वाटप न करता रोख रक्कम लाभ्यार्थ्याच्या खात्यात जमा करण्याबाबत नमुद असल्याने त्यांचा खात्यात सदर रक्कम जमा करण्यात यावी. वस्तुस्वरुपात लाभ वाटप केल्याने दिव्यांगाना देण्यात येणा-या ५ टक्के निधीच्या रक्कमे मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. र्चचा करते वेळी कलीम शेख यांनी वरीष्ट अधीकारी यांनी सागीतले काही ग्रामपंचायत, पंचायत समिती, व जिल्हापरीषद स्तरावर दिव्यांगाना अनुकुल नसलेल्या वस्तुचे वाटप करुन दिव्यांग निधी खर्च होत आहे हि बाब नियमबाहय असुन वस्तुचे वाटप केल्याने दिव्यांगाना कोणतेही विशेष मदत होत नाही. तसेच पाच टकके दिव्यांग निधी संपूर्ण खर्च न करता थातुर मातुर खर्च करुन योजना राबविण्यात येत आहे.
शासन निर्णयात पंचायत राज संस्थांनी त्याच्या स्वउत्पान्नातुन ५ टक्के निधीतुन घ्यावयाच्या अपंग कल्याणसाठी योजना राबवियाबाबत मार्गदर्शन तत्वे नमुद केलेले असुन, महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनीयम १९६१, च्या कलम २६१ चे उल्लघन झाल्याचे दिसुन येते.तरी ५ टक्के निधीतुन अपंगाकरीता विकासाच्या योजना मार्गदर्शक सुचनानुसारच राबविण्यात याव्या.
वस्तू स्वरुपात योजना राबविल्याने धडधाकट दिव्यांग धावपळकरुन कागत पत्राची र्पूतता करुन जीएसटीसह बिल आणुन लाभ मिळवितात. परंतु असर्मथ व बहुदिव्यांग टक्केवारीने जास्त दिव्यांग धावपळ न करु शकल्याने लाभापासुन वंचीत राहतात. तरी असर्मथ बहुदिव्यांग व टक्केवारीने जास्त असलेले दिव्यांगांयांची वर्गवारीनुसार नोंदी करणे फार गरजेचे आहे.
शासन निर्णयानुसार कार्यवाही न झाल्यास दिनांक १५ ऑगस्ट २०२४ पासुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे उपोषण करण्यात येईल अशे सांगण्यात आले त्यावेळेस अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख व संघटनेचे जिल्हा अध्याक्ष प्रकाश चोपडे मलकापूर शहर अध्याक्ष शेख वसीम कौसर खान खामगाव तालूका अध्याक्ष शंकर चव्हाण बूलढाणा तालूका अध्याक्ष गौतम घेवंदे चिखली तालुका अध्यक्ष रामेश्वर चव्हाण बूलढाणा तालूका अध्यक्ष असलम खान बुलढाणा शहर अध्यक्ष शेख एजाज शेख समीर शेख तसलीम सैय्यद फरीद व जिल्यातील असंख्यात दिव्यांग हजर होते