मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग सेलच्या अंतर्गत पोलिस विभागाच्या सहकार्याने कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) संदीप काळे सर (मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती दिली व त्याबाबत मार्गदर्शन केले. पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात कायद्यांचा अभ्यास कसा करावा व त्याचा योग्य वापर कसा करावा, यावर विद्यार्थ्यांनी संदीप काळे यांना प्रश्न विचारले व त्यांनी सविस्तर उत्तर दिले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्राध्यापक रमाकांत चौधरी आणि प्राध्यापक डी. पी. खरात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. साक्षी जुनारे, प्रा. रूपाली पाटील आणि विद्यार्थिनी कोमल राणे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध कायद्यांबद्दल अधिकाधिक माहिती मिळवली. प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांनी कायद्यांचे महत्त्व समजून घेत आपल्या आयुष्यात त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन केले.