बुलडाणा:- दि.9 आयुष्मान भारत योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आयुष्य (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘आयुष्मान संवाद’ कार्यक्रम बुलढाण्यात नुकताच संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी सभागृहात आयोजित या कार्यक्रमास राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, दिल्लीच्या सहसंचालक रेश्मा परवीन, सहसंचालक अमितेश नवाल, सहसंचालक डॉ. अक्षय जैन, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण (भा.प्र.से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंदरे, वरिष्ठ व्यवस्थापक माधवी चामला, सहाय्यक व्यवस्थापक डॉ. शुभदा तल्ला, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी डॉ. तमसिल, कार्यक्रम अधिकारी डॉ. निधी कोनाडे, वरिष्ठ कार्यक्रम सहाय्यक भगवान मराठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, डॉ. भागवत भुसारी, केंद्रीय राज्यमंत्र्याचे स्विय सहाय्यक डॉ. गोपाल डिके, राजू भोर, राहुल सोलंकी, तसेच विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे, डॉ. सय्यद कदिर, डॉ. जिल्हा समन्वयक विवेक सावके-बुलढाणा, डॉ. सचिन सानप, डॉ.सुमित जैन, विमा कंपनीचे डॉ.आनंद जैन, डॉ.योगेश पाटील, डॉ.चेतन शेळके, सूरज पवार आणि अंगिकृत रुग्णालय प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मनोगत व्यक्त करतांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच वाढविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तर डॉ. अक्षय जैन यांनी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा महाराष्ट्रामध्ये 2.85 कोटी लाभार्थींनी लाभ घेतला. या योजनेमध्ये राज्यात एकूण 1504 खाजगी रुग्णालय अंगिकृत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7.23 लाख आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या योजनेविषयी काही तक्रार असल्यास 14555 या क्रमांकावर किंवा cgrm.pmjay.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार करण्याचे आव्हान केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंदरे यांनी एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजननेचे सादरीकरण केले. यात लाभार्थ्यांना मदत आणि सहाय्य पुरविण्याठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र नियुक्त केले आहेत. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी 1800 233 2200/ 155 388, इतर राज्यांसाठी 1800 11 1565 / 14555 हे क्रमांक सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वाटप करण्यात आले. तसेच एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने मध्ये उत्कृष्ट काम केल्याबदल राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला