Headlines

शेगावमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

शेगाव : शेगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राजू निंबटकर, तिरुमाला निंबटकर, भाग्यलक्ष्मी नरसिंगराज येडला (सर्व रा. राजुरा, चंद्रपूर), सागर बत्तुलवार, घनश्याम बत्तुलवार, मंगला बत्तुलवार, तसेच सागरचे मोठे बाबा, मोठी आई व एक पुजारी (सर्व रा. शेगाव) यांचा समावेश आहे.
फिर्यादी मुलगी बल्लारशाह येथे मैत्रिणीच्या घरी भेट देण्यासाठी गेली असताना तिची ओळख मैत्रिणीच्या चुलत काकाशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तिच्या पालकांनी मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे माहीत असूनही, तिचे लग्न १५ जुलै रोजी सागर बत्तुलवार (वय २७) याच्यासोबत लावून दिले. लग्नानंतर काही दिवसांनी पतीला तिच्या जुन्या संबंधांबद्दल माहिती मिळाल्याने वाद निर्माण झाला. परिणामी, १५ ऑगस्ट रोजी तिला माहेरी सोडण्यात आले. अल्पवयीन असतानाही विवाह लावल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!