खामगाव: शेगाव तालुक्यातील वरूड येथे चोरट्यांनी घरफोडी करत ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषीकेश पंजाबराव कोकाटे यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातून त्यांनी मुख्य दरवाज्याची कडी तोडून कपाटातील रोकड, दागिने आणि दोन मोबाईल चोरले. चोरीस गेलेल्या मालामध्ये ५० हजार रुपये रोख, १५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाइलचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०५ अ आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.