नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूर येथे शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण
मलकापूर :- शिक्षक दिनाचे औचित्य साधून नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूर येथे आज एक वेगळाच आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या नवीन होऊ घातलेल्या प्रशस्त इमारतीच्या समोरील आवारात वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रमुख पाहुणे श्री. साहिल इंगळे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनपर…
