Headlines

सततच्या नापिकीला कंटाळून विधवा शेतकरी महिलेची आत्महत्या

पातूर : तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशनांतर्गत येणाऱ्या पांढूर्णा येथील विधवा महिला शेतकरी शशिकला साहेबराव शेळके (५४) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे घरच्यांनी सांगितले. शशिकला शेळके ह्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यात घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे व शेतातील कोणत्याही प्रकारचे उत्पन्न होत नसल्यामुळे त्या नेहमी चिंताग्रस्त राहत होत्या. या विचारातच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. विधवा…

Read More

मित्रांसोबत विहिरीवर आंघोळीसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू,खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : मित्रांसमवेत विहिरीवर अंघोळीसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील वझर येथे मंगळवारी उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, विकास शंकर वाकोडे (२३) हा युवक गावातील काही मुलांसोबत शासकीय पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर अंघोळीसाठी गेला. दरम्यान, विहिरीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते मंगळवारी सकाळी ९…

Read More

वडिलांच्या उपचारासाठी बाहेरगावी गेलेल्या व्यावसायिकाच्या घरात चोरी, दाग दागिन्यांसह ६८ हजारांचा ऐवज लंपास..

खामगाव : येथील टीचर कॉलनी भागात एका व्यावसायिकाचे घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह ६८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारी वरून पोलिसांनी, गुन्हा दाखल केला आहे. टीचर कॉलनीतील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक जमालउद्दीन मोहीउद्दीन देशमुख (४०) हे ३० एप्रिल रोजी वडिलांच्या उपचारकामी नागपूरला गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने…

Read More

१००% निकालाची परंपरा कायम राखून CBSE बोर्ड परीक्षेत स्कूल ऑफ स्कॉलर्स, तालुक्यातून प्रथम

दि. १३ मे २०२४, मलकापूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथील विद्यार्थ्यांनी नुकताच इयत्ता १० वी सीबीएसई बोर्ड २०२३-२४ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, दर वर्षाप्रमाणे संपूर्ण मलकापूर तालुक्यातून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवत शाळेतील विद्यार्थ्यांनी रिद्धिका अजयकुमार शेखावत हिने ९७.८% गुण करून शाळेतून तसेच संपूर्ण तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करून १००% निकालाची परंपरा कायम राखून…

Read More

उजव्या हातावर RPP गोंदलेल्या व्यक्तीचा मलकापूर शहरात आढळला मृतदेह; तुम्ही ओळखत असाल तर पोलिसांना सांगा

मलकापूर : शहरातील सुभाषचंद्र बोस नगर, आठवडी बाजारजवळ असलेल्या एका दुकानाच्या ओट्यावर अंदाजे ३० वर्षाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह ११ मे रोजी आढळून आला असून त्या अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुभाषचंद्र बोस नगर आठवडी बाजारजवळ असलेल्या पाचपांडे यांचे बंद दुकानाच्या ओट्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती राजकुमार वानखेडे यांनी शहर…

Read More

रावेर मतदारसंघात मतदान संपन्न, ताई ची हॅट्रिक होणार की श्रीराम पाटील ताई ला रोखणार, कोण किसपे भारी 4 जुनला होणार स्पष्ट

मलकापूर:- लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान आज सुरू आहे. देशातील ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये रावेर मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदार संघात 55.36% टक्के मतदान झाले ची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. रावेर लोकसभाच्या मलकापूर मतदारसंघांमध्ये सकाळच्या सुमारास रिमझिम पावसाचा सावट होता. या मतदात्यांनी मतदान केंद्रावरती…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

बुलढाणा : केळवदहून बुलडाणाकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १० मे च्या रात्री घडली. प्राप्त माहितीनुसार बुलढाणा ते चिखली मार्गावरील केळवद येथील पवन गजानन खिल्लारे वय १७ वर्ष हा शुक्रवारी रात्री काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने बुलडाणाकडे जात असताना अंत्री तेली फाट्याजवळ अज्ञात वाहनाने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली….

Read More

घरून निघून गेलेल्या वयोवृद्ध महिलेचा आढळला मृतदेह, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा : तालुक्यातील चिंचपूर फाटा येथे एका ७७ वर्षीय वेडसर महिलेचा मृतदेह १० मे ला आढळला. मृतक महिलेचे नाव केसरबाई सुरडकर असे आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. चिंचपूर येथील निंबाजी सुरडकर यांनी बोराखेडी पोस्टे. ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांची वयोवृध्द आई केसरबाई सुरडकर यांच्या डोक्यात फरक पडला होता. त्या इकडे तिकडे…

Read More