
मलकापूर मतदारसंघातील १३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
मलकापूर :- विधानसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात उतरले होते. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, महायुतीचे चैनसुख संचेती यांनी महाविकास आघाडीचे राजेश एकडे यांचा २६,३९७ मतांनी दारुण पराभव केला. या विजयाने महायुतीने मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. निवडणुकीत एकूण २,०६,४४३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, १५ पैकी १३ उमेदवारांना मतदारांचा…