
देऊळगाव घुबे येथे अवैध रेतीसाठ्यावर महसूल विभागाची कारवाई
चिखली : खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध उत्खनन करून लपवून ठेवलेल्या सुमारे १३६ ब्रास रेतीवर महसूल विभागाने धडक कारवाई केली. देऊळगाव घुबे शिवारातील गट क्रमांक ६२७ मध्ये या रेतीचा साठा आढळून आला. तपासादरम्यान, पंजाब दिनकर घुबे यांच्या मालकीच्या जागेत ३० ब्रास, परसराम पांडुरंग घुबे यांच्या जमिनीवर २० ब्रास, तर कांताबाई विजय घुबे यांच्या शेतात ५० ब्रास रेती…