Headlines

दिवसा ढवळ्या दरोडा; मुक्ताईनगर तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून लाखोंचे दागदागिने लुटले, जळगाव जामोद तालुक्यातील घटना!

  जळगाव. जा :- मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील सराफा व्यापारी स्वप्नील करे आणि मधुकर लुले यांच्यावर धानोरा-पळशी मार्गावर १७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे ८ किलो चांदी, १०० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम मिळून एकूण १५ लाखांचा ऐवज लुटला. व्यापारी व्यवहारासाठी आसलगाव येथील सराफा बाजारात जात असताना ही…

Read More

दर्शनाला जात असतांना समृद्धी महामार्गावर अपघात; टायर फुटल्याने कार पलटी, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी!

मेहकर : – नाशिकहून शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनाला जाणाऱ्या खुळे कुटुंबीयांच्या कारला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर टोल क्रमांक २९१ जवळ गाडीचे टायर फुटल्याने नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात महेश खुळे (वय ४४) गंभीर जखमी झाले. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच दीपाली…

Read More

अवैध रेती वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल! जलंब पोलिसांची कारवाई

खामगाव : – अंबोडा नदीपात्रातून विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जलंब पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी 12.30 वाजता खोलखेड माटरगाव चौफुलीवर घडली. ट्रॅक्टर चालक सुरज कैलासिंग राजपूत (वय 33, रा. खोलखेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना अंबोडा नदीपात्रातून अवैध रेती वाहतुकीची माहिती मिळताच जलंब पोलीस ठाण्याचे…

Read More

बिबट्याच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी, आरडाओरड केल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला; मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ३२ वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याला तातडीने जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रवि रमेश निंबोळकर (वय ३२) हे सकाळी शेतात जाण्यासाठी दुचाकीने गट क्र. २४१ दाभा रस्त्याने जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला…

Read More

बांगलादेश मधील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध मलकापूर मधील हजारो हिंदु उतरले रस्त्यावर भारत सरकारने युनिस्को वर दबाव आणून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचार थांबवावे गृहमंत्री यांच्याकडे मागणी

  मलकापूर (प्रतिनिधी): बांगलादेशातील हिंदू, जैन, बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने १५ डिसेंबर रोजी मूक मोर्चा काढण्यात आला. गोविंद विष्णू महाजन विद्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात हजारोंची उपस्थिती होती.या मोर्चादरम्यान तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यात भारत सरकारने जागतिक मानवाधिकार संघटनांवर दबाव टाकून अत्याचार थांबवण्याची आणि इस्कॉन मंदिराचे संत स्वामी…

Read More

महात्मा गांधी उद्यानाजवळ लोखंडी रॉडने मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, खामगाव येथील घटना!

खामगाव : – येथील महात्मा गांधी उद्यानाजवळ बस थांब्यासमोर १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोखंडी रॉडने एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी उद्यानाजवळील बस थांब्यासमोर शेख कमरुद्दीन शेख कयामोद्दीन (३०), शेख सलमान शेख सलीम (२४), कलीमोद्दीन अजीसद्दीन मिर्झा (३०), शेख…

Read More

दिगंबरा…दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‘च्या जयघोषित दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा; महिलांनी पावली खेळत मलकापूरकरांचे वेधले लक्ष

मलकापूर ( दिपक इटणारे )– दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्त जयंती उत्सवानिमित्त मलकापूर शहरात श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४ वाजता श्री स्वामी समर्थ केंद्र येथून सुरू झालेल्या या दिंडीने शहरातील प्रमुख भागांतून भक्तांना भक्तीरसात न्हावून निघाली. दिंडीच्या मार्गामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र, पद्मालय, मुकुंद नगर, प्रशांत नगर, टेलिफोन…

Read More

दिगंबरा…दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‘च्या जयघोषित दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा; महिलांनी पावली खेळत मलकापूरकरांचे वेधले लक्ष

मलकापूर – दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्त जयंती उत्सवानिमित्त मलकापूर शहरात श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४ वाजता श्री स्वामी समर्थ केंद्र येथून सुरू झालेल्या या दिंडीने शहरातील प्रमुख भागांतून भक्तांना भक्तीरसात न्हावून निघाली. दिंडीच्या मार्गामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र, पद्मालय, मुकुंद नगर, प्रशांत नगर, टेलिफोन कॉलनी, तुलसी ज्वेलर्स,…

Read More

जगदंबच्या तालावर थिरकले उत्तरप्रदेशवासी!

  मलकापूर:- मलकापूर येथील श्री. जगदंब ढोल पथक हे 11-14 झाशीच्या दौऱ्यावर गेले होते. 12 आणि 13 तारखेला झाशीच्या कार्यक्रमात मानवंदना देऊन पथक आता परतीच्या प्रवासाला निघाले असून, 12 आणि 13 या दोन दिवसाच्या प्रदर्शनात जगदंब ढोल पथकाने गुरसराय येथे आयोजित 1008 श्री. नेमिनाथ भगवान जिनबिम्ब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव मध्ये तडाखेदार वादन केले असून, आयोजक…

Read More

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात मलकापूरात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा! हजारो हिंदू बांधवांनी मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन..

मलकापूर ( उमेश ईटणारे ) :- बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांविरोधात मलकापूर शहरात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाज, मलकापूर यांच्या वतीने दिनांक 15 डिसेंबर 2024, रविवार रोजी करण्यात आले आहे. गोविंद विष्णू महाजन विद्यालय, मलकापूर येथून सकाळी 11 वाजता या मोर्चाची सुरुवात…

Read More
error: Content is protected !!