Headlines

गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून काका-पुतण्याला मारहाण, जलंब पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

जलंब: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याला मारहाण झाल्याची घटना कोक्ता फाटा येथील गारवा हॉटेलसमोर ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता घडली. निलेश शेषराव ताठे आणि त्यांचे काका महेश नामदेव ताठे हे गारवा हॉटेलसमोर उभे होते. यावेळी खामगावकडून येणाऱ्या चारचाकी वाहन व मोटरसायकलमुळे झालेल्या धक्क्यावरून वाद झाला. वाद मिटवण्यासाठी पुढे गेलेल्या महेश ताठे यांना शुभम संतोष चांदुरकर…

Read More

किरकोळ कारणावरून मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल! मलकापूर तालुक्यातील जांभुळधाबा येथील घटना

मलकापूर: तालुक्यातील जांभूळधाबा येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या उपाध्यक्षासह त्यांच्या नातेवाईकावर मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी गजानन नीना मेहेंगे (वय ५५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे हा प्रकार घडला. मंदिराचे माजी अध्यक्ष यांच्या…

Read More

विहिरीत पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा :- तालुक्यातील ब्राम्हंदा गावात १९ वर्षीय तरुण सौरभ उर्फ वैभव ईश्वर शिंदे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतात काम करत असताना पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज लावला जात आहे. सौरभ ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतात काम करताना दिसला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही….

Read More

मलकापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मोठ्या उत्साहात संपन्न

  मलकापूर :- शिक्षण विभाग पंचायत समिती मलकापूर व तालुका विज्ञान शिक्षक संघटना मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री डॉ. व्ही.बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर आयोजित करण्यात आली होती.या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री चैनसुखजी संचेती यांच्या शुभहस्ते करण्यात…

Read More

पूर्णा नदीतून अवैध रेतीची वाहतूक; टिप्पर मालकास एक लाखाचा दंड! महसूल विभागाची कारवाई

  नांदुरा :- पूर्णा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने कठोर कारवाई करत टिप्पर मालक व चालकावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. २७ डिसेंबर रोजी डीघी येथे तहसीलदार श्रीशैल वट्टे व तलाठ्यांनी ही कारवाई केली होती. त्या वेळी, टिप्परमध्ये दोन ब्रास रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याबाबत टिप्परमालकाकडून ४१ हजार ७००…

Read More

अवैध देशी दारू विक्रेत्यावर नांदुरा पोलिसांची कारवाई.. एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  नांदुरा :- निमगाव येथे सार्वजनिक रोडवर घरासमोर अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर २ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे देविदास अंबादास जामोदे (वय ४४) याला ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत ९० मिलीच्या देशी दारूच्या २० सीलबंद बाटल्या, १००० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि वायरची थैली जप्त करण्यात आली. आरोपीवर…

Read More

खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची वरिष्ठांशी गैरवर्तणूक; पोलीस अधीक्षकांनी केले कर्मचाऱ्याचे निलंबन!

  खामगाव :- खामगाव शहर पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याला वरिष्ठांशी असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. गजानन बोरसे, हे खामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी असून, त्यांच्याविरुद्ध वर्तणुकीबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या असभ्य वर्तणुकीमुळे वरिष्ठांशी संबंध बिघडल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी…

Read More

दिव्यांग अल्पवयीन मुलावर अत्याचार; दोघे आरोपी जेरबंद, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव :- तालुक्यात एका गावात अल्पवयीन दिव्यांग मुलावर दोघांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी स्वप्नील गवारगुरु (२९) आणि आशिष शिंदे (३५) यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

बहुजन उद्धारक सेवा समितीच्या वतीने सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

मलकापूर :- सावित्रीबाई फुले जयंती अर्थात बालिका दिनानिमित्त बहुजन उद्धारक सेवा समितीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील स्वामी विवेकानंद आश्रम येथील अभ्यासिकेत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाईंच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात मिलिंद डवले, अश्विनीताई काकडे बहुजन उद्धारक सेवा समितीचे सचिव…

Read More

कोलते महाविद्यालयाची औद्योगिक ऑटोमेशनकडे वाटचाल..

  मलकापूर : स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर औद्योगिक क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या “औद्योगिक ऑटोमेशन – पीएलसी आणि स्काडा” या विषयावरील पाच दिवसीय मूल्यवर्धित कोर्स यशस्वीरित्या मागील आठवड्यात नुकतेच पार पाडले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने झाली. या कोर्सचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते…

Read More
error: Content is protected !!