Headlines

सानिया कार गॅरेजला भीषण आग, 10 ते 12 कारसह स्पेअर पार्ट्स जाळून खाक; लाखोंचे नुकसान, मलकापूर शहरातील घटना!

  मलकापूर:- मलकापूरच्या बुलढाणा रोडवरील सानिया कार गॅरेजमध्ये आज, 20 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या 10 ते 12 चारचाकी वाहनांसह सुमारे 10 ते 15 लाखांचे स्पेअर पार्ट्स जळून खाक झाले. या दुर्घटनेत एकूण नुकसान लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गॅरेजमध्ये उभी…

Read More

महादेव मंदिरातील साहित्यावर चोरट्यांची काळी नजर.. गावकऱ्यांनी तीन चोरट्यांना रंगेहाथ पकडले, खुदनापूर येथील घटना!

जानेफळ: खुदनापूर येथील महादेव मंदिरातील धार्मिक वस्तू चोरी करून नेत असताना गावकऱ्यांनी तिघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेने गावात खळबळ माजली असून आरोपींकडून चोरी केलेल्या वस्तूंसह त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. १५ जानेवारी रोजी गावातील महादेव मंदिरातून तिघेजण काही वस्तू चोरी करून पळत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पाठलाग करून आरोपींना पकडले….

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी कंबर कसून सज्ज रहा – ना. प्रतापराव जाधव

मलकापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अनुषंगाने सर्व शिवसैनिकांनी कंबर कसून सज्ज रहावे असे आवाहन केंद्रीय आयुष्य तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी १९ जानेवारी रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित मलकापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन प्रसंगी केले. प्रारंभी बाजार समितीच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती…

Read More

राज्यस्तरीय कुणबी-मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

मलकापूर – राज्यस्तरीय कुणबी-मराठा समाजाचा भव्य दिव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यासाठी आज मलकापुर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष अमोल टप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवा पाटील गोंड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या बैठकीत पारंपरिक पद्धतींसह आधुनिक तंत्रांचा अवलंब करून समाज बांधवांसाठी सोयीस्कर वधू-वर मेळावा आयोजित करण्याबाबत चर्चा…

Read More

राष्ट्रीय यशाच्या निमित्ताने कोलते महाविद्यालयात सन्मानाचा क्षण

  मलकापूर:- स्थानिक पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. महाविद्यालयाच्या आयडिया इनोव्हेशन प्रोजेक्टची निवड राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी देशाची राजधानी दिल्ली येथे करण्यात आली असून, या प्रकल्पाने महाराष्ट्राचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व केले आहे. महाविद्यालयातील प्रा. लेफ्टनंट मोहम्मद जावेद यांच्या नेतृत्वाखालील टीमने, ज्यामध्ये कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा. सुदेश फरपट, प्रा. विजय ताठे आणि…

Read More

दरोडेखोरांचा हैदोस; पशुवैद्यकीय डॉक्टरच्या पत्नीचा खून, डॉक्टर गंभीर जखमी, मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील दाभाडी येथे आज, १९ जानेवारी रोजी पहाटे दरोडेखोरांनी पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी दरोडा टाकत त्यांची पत्नी माधुरी टेकाळे यांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेत गजानन टेकाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास टेकाळे दाम्पत्याच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश करून मालमत्तेची लूट सुरू केली. विरोध…

Read More

शाळा सुरू होऊन सहा महिला उलटले; मलकापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये गणवेश वाटप रखडले; गुरुजी गणवेश केव्हा मिळणार विद्यार्थ्यांची ओरड

मलकापूर( दिपक इटणारे ) :- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशांचे वाटप अद्याप झालेले नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिने उलटूनही गणवेश उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी साध्या कपड्यांमध्ये शाळेत येत आहेत. गणवेश वाटप ही योजना शिक्षणातील समानता व शिस्तीला चालना देण्यासाठी शासनाने राबवली आहे. मात्र, यंदा निविदा प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे गणवेश…

Read More

मलकापुरातील अनेक शाळांकडून शासनाच्या नियमांना केराची टोपली, अनेक शाळा सकाळी 9 आधीच सुरू.. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार?

  मलकापूर ( उमेश ईटणारे ):- राज्यभरात थंडीने कहर केला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पूर्व प्राथमिक (नर्सरी) ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतरच भरवण्याचे आदेश राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना देण्यात आले आहेत. यासंदर्भात शासन निर्णय…

Read More

कुत्रा आडवा आल्याने कारचा अपघात; सीट बेल्ट आणि एअर बॅगमुळे चौघे प्रवासी बचावले

बुलढाणा :- समृद्धी महामार्गावर गुरुवारी १६ जानेवारी रोजी कुत्रा आडवा आल्याने कार (एमएच १२-एफवाय ५९०९) अनियंत्रित होऊन बेरिकेडला धडकली. यात कारचे मोठे नुकसान झाले, पण सीट बेल्ट आणि एअर बॅगमुळे चौघे प्रवासी बचावले. सिंदखेडराजा जवळ घडलेल्या या अपघातात स्लोक कोळमकर (२४) व पुष्पेंद्र गुभा (२७) गंभीर जखमी झाले. मोनाली टीपाल (२८) आणि चालक संकरित रेड्डी…

Read More

शिराढोण येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा शुभारंभ

  मलकापूर: विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे शिराढोण येथे विशेष शिबिराचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिरात रस्ते दुरुस्ती, नदीकाठ आणि स्मशानभूमी स्वच्छता यांसह शिव्या मुक्त गाव, घराघरात संविधान, अंधश्रद्धा निर्मूलन, डिजिटल साक्षरता व स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय मोरेशजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्राचार्य डॉ….

Read More
error: Content is protected !!