
शेगावमध्ये क्षुल्लक कारणावरून भाविकांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेगाव :- येथील मंदिर परिसरात लहुजी वस्ताद चौकात दर्शनासाठी आलेल्या अकोला येथील भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम जगदीश श्रीवास (वय २९, रा. अकोला) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह गजानन महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर आले असता आरोपी कार्तिक वानखडे याने…