
एकाच रात्री चार घरे फोडली, ६.४४ लाखांचा ऐवज लंपास; शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील घटना!
जलंब – शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे ४ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अमित आळशी यांच्या घरातून एकूण ५ लाख ६५ हजारांचे दागिने व रोकड चोरली….