Headlines

मलकापूर बसस्थानकासमोर गौरव सावजीने माजवली दारूची दहशत; ऑटो चालकाला व स्कार्पिओ चालकाला केली मारहाण!

मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहराच्या बसस्थानकासमोर आज दि.18 रोजी सायंकाळी गौरव सावजी या मद्यधुंद इसमाने भर रस्त्यावर धिंगाणा घालत नागरिकांचा जीव मेटाकुटीला आणला. रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी आडवी लावून या व्यक्तीने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना शिवीगाळ केली तसेच एका ऑटोचालक व स्कॉर्पिओ चालकावर हल्ला करून मारहाण केली. या प्रकारामुळे रस्त्यावर अर्धा किलोमीटरपर्यंत वाहतूक…

Read More

अंढेरा परिसरात अवैध धंद्यांचा उघडपणे धुमाकूळ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांचे निवेदन!

अंढेरा :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार वर्षांपासून अवैध दारू विक्री, मटका, वरली, हातभट्टी, आणि वाळू वाहतुकीसारखे गैरकृत्य उघडपणे सुरू असून, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते कार्तिक खेडेकर आणि विठ्ठल खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला…

Read More

 मलकापूरचा कियान डागा ‘बाल वैज्ञानिक’ सन्मानित, सिल्वर मेडल पटकावले

मलकापूर : येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स (CBSE) मलकापूर शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु. कियान विवेक डागा याने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा यशस्वीरीत्या पार करून सिल्वर मेडल मिळवले आहे. कियानने या स्पर्धेच्या चारही फेऱ्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. प्रारंभीच्या दोन लेखी पात्रता परीक्षांमध्ये यश संपादन केल्यानंतर, तिसऱ्या फेरीत Sustainable Landscaping या थीमवर आधारित Garden of…

Read More

समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांना ‘संघर्षयोध्दा’ पुरस्कार

    मलकापूर : – भाई अशांत वानखेडे यांचा संघर्ष अन् त्यांनी त्या संघर्षातून समाजासा’ी केलेले कार्य हे अजरामर असेच आहे. अशा व्यक्तीच्या कार्याचा ‘ेवा आपण जतन करणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या कार्याची दखल म्हणून आज सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत त्यांचा ‘संघर्षयोध्दा’ हा पुरस्कार देवून सन्मान करीत असल्याचे समस्त बौध्द समाज सत्कार समितीच्या वतीने…

Read More

लांजुड फाट्यावर ३७ लाखांचा विमल गुटखा पकडला

जलंब : खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील लांजुड फाट्यावर जलंब पोलिसांनी सापळा रचून ३७ लाख रुपयांचा प्रतिबंधित विमल गुटखा पकडला. आयशर गाडी (MH ०९ EM ९९९४) मधून गुटख्याची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत २३.६८ लाखांचा गुटखा व १५ लाखांची आयशर गाडी असा एकूण ३८.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा…

Read More

गजानन महाराज संस्थान पार्किंगमधून सेवाधाऱ्याची दुचाकी चोरीला

शेगाव – श्री गजानन महाराज संस्थानमध्ये सेवा देण्यासाठी आलेल्या सेवाधाऱ्याची दुचाकी पार्किंगमधून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ६ ते ९ एप्रिल दरम्यान घडली असून, याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवंता वसंता ताले (वय ४०, रा. बोरीअडगाव, ता. खामगाव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ६ एप्रिल…

Read More

बसस्थानकासमोर उभ्या दोन मॅजिक गाड्यांना आग; शहरात खळबळ

शेगाव – शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका अघोषित घटनेने शहरवासीयांमध्ये खळबळ उडवली आहे. शेगाव बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या दोन मॅजिक वाहनांना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आगीची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत दोन्ही…

Read More

शेतात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; ओळख पटविण्याचे साखरखेर्डा पोलिसांचे आव्हान.

साखरखेर्डा — ग्राम लव्हाळा येथील शेतात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षांदरम्यान असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. शेतकरी साहेबराव सवळतकर यांच्या शेतात सदर मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. विशेष बाब म्हणजे या व्यक्तीवर कोणतेही कपडे नव्हते. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, सदर इसम गेल्या काही…

Read More

मुरूम उत्खननादरम्यान आग लागून जेसीबी मशीन जळून खाक; पिंप्री देशमुख शिवारातील घटना; शॉर्टसर्किटची शक्यता

खामगाव – तालुक्यातील पिंप्री देशमुख शिवारात मुरूम उत्खननाच्या कामादरम्यान जेसीबी मशीनला अचानक आग लागून संपूर्ण मशीन जळून खाक झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शंकर होनाळे यांच्या मालकीची ही जेसीबी मशीन मुरूम काढण्याचे काम करत होती. उत्खनन सुरू असतानाच मशीनने अचानक पेट घेतला. काही क्षणातच संपूर्ण मशीन आगीच्या भक्षस्थानी पडले. घटनेची माहिती…

Read More

खरबुज चोरीप्रकरणी दोघांना अटक ढोरपगाव शिवारातील घटना; चोरट्यांकडून ८ हजारांचे खरबुज व दुचाकी जप्त

पिंपळगाव राजा : ढोरपगाव शिवारात खरबुज चोरीसाठी आलेल्या दोघा चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांकडून सुमारे ८ हजार रुपये किमतीचे १५० ते १६० किलो खरबुज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. ४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. आरोपी अमन दीपक लोखंडे आणि प्रेम दादाराव इंगळे, दोघेही रा. भालेगाव बाजार,…

Read More
error: Content is protected !!