खामगाव : अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या एका ७० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध इसमाला धडक दिली. यात पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नॅशनल हायवे क्र. ५३ वरील वडीजवळ २२ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, ७० वर्षीय एक अनोळखी वयोवृद्ध इसम रस्त्याने जात असताना नॅशनल हायवे क्र. ५३ वरील वडीजवळ त्यास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी डॉ. मानसी कुटाल तर्फे विश्रांती कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, ११६ (१) (२), सहकलम मोटार वाहन कायदा १३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.